-आणि ‘त्या’ देयकांचे एका तासात वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 21:58 IST2019-03-05T21:58:43+5:302019-03-05T21:58:59+5:30
तालुक्यातील अनेक गावातील चहा-पानटपरीवर टांगण्यात आलेल्या वीजदेयकांचे मंगळवारी तातडीने वितरण करण्यात आले.

-आणि ‘त्या’ देयकांचे एका तासात वितरण
धारणी : तालुक्यातील अनेक गावातील चहा-पानटपरीवर टांगण्यात आलेल्या वीजदेयकांचे मंगळवारी तातडीने वितरण करण्यात आले.
‘वीजदेयके चहा-पानटपरीवर’या वृत्तातून ‘लोकमत’ने महावितरणच्या कंत्राटदाराच्या मनमानीवर प्रकाश टाकला होता. त्याची दखल घेत मंगळवारी अवघ्या एका तासात टांगलेली वीजदेयके संबंधित ग्राहकांच्या घरी पोहचविण्यात आली. महावितरणच्या कंत्राटदाराने वैरागड येथील पानटपरीवर वीजदेयके बेवारस अवस्थेत टांगून ठेवल्याचा प्रकार ‘लोकमत’ने कॅमेऱ्यात टिपला होता. त्याची दखल घेत महावितरणचे सहायक अभियंता तायडे व शाखा अभियंता जवादे यांनी कंत्राटदाराला सूचना केली. त्या सूचनेवरून मंगळवारी सर्व देयके चहापान टपरीवरून हटविण्यात आली.