अंध विदूरच्या यशाने आनंदले वझ्झर

By Admin | Updated: May 28, 2015 00:25 IST2015-05-28T00:25:36+5:302015-05-28T00:25:36+5:30

वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद व बेवारस बालगृहातील विद्यार्थी तसेच शंकरबाबांचा मानसपूूत्र विदूर शंकरबाबा ...

Anandle Wazhar, with the success of Blind Vidur, | अंध विदूरच्या यशाने आनंदले वझ्झर

अंध विदूरच्या यशाने आनंदले वझ्झर

६२ टक्के गुण : ‘लोकमत’मुळे आईच्या पासवर्डशिवाय कळला निकाल
नरेंद्र जावरे अचलपूर
वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद व बेवारस बालगृहातील विद्यार्थी तसेच शंकरबाबांचा मानसपूूत्र विदूर शंकरबाबा पापडकर याने बारावीच्या परीक्षेत ६२ टक्के गुण मिळविले.
अंध विदूरने मिळविलेल्या या यशाने वझ्झरचे बालगृह आनंदले. आईच्या नावाचा ‘पासवर्ड’ असल्याखेरीज निकाल कळत नाही. परंतु गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता यंदा बोर्डाने अनाथ विद्यार्थ्यांसाठी ही अट शिथिल केली आहे. त्यामुळे विदूरच्या यशाचा जल्लोष वझ्झरला करता आला.
वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद व बेवारस बालगृहात १२३ मुले-मुली आहेत. शंकरबाबा पापळकर यांनी त्यांचे पितृत्व स्वीकारले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात बेवारस आढळलेल्या या मतिमंद, गतिमंद आणि अंध व अपंग मुलांचा शंकरबाबाच मायेने सांभाळ करतात.

- अन् कळला निकाल
बोर्डाने आॅनलाईन निकाल जाणून घेण्याकरिता आईच्या नावाचा ‘पासवर्ड’ अनिवार्य केला आहे. या अटीमुळे सन २०१४ मध्ये शंकरबाबांच्या मानसकन्या माला व गांधारी यांचा निकाल कळू शकला नव्हता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यावर माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षांनी तातडीने दखल घेऊन माला व गांधारीचा निकाल दूरध्वनीवरून स्वत: कळविला होता. आताअनाथ मुलांसाठी निकाल पाहण्याची सुविधा बोर्डाने उपलब्ध करुन दिली आहे.

विदूरच्या यशामुळे माझ्या जीवनाचे सार्थक झाले. आहे. तो आता या अनाथ ुमुलांचा सांभाळ करु शकतो, याची खात्री आहे. माझा अंध विदूर मोठे लक्ष्य नक्कीच प्राप्त करेल. आपल्या १२३ बहिण भावंडांचा तो सांभाळ करेल.
शंकरबाबा पापळकर, वझ्झर, ता. अचलपूर

डोळस मुलांसोबत परीक्षा देऊन मिळालेले हे यश हे माझ्या इतर भावंडांना प्रेरणा देणारे ठरेल. पुढचे शिक्षण घेत असतानाच त्यांचा सांभाळ करणे हेच माझे ध्येय आहे.
विदूर पापळकर

Web Title: Anandle Wazhar, with the success of Blind Vidur,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.