बारावीच्या निकालाने वझ्झरचे बालसुधारगृह आनंदले

By Admin | Updated: May 26, 2016 01:11 IST2016-05-26T01:11:49+5:302016-05-26T01:11:49+5:30

वझ्झर येथील स्व. अंबादासपंत मतिमंद अंध-अपंग, बाल सुधारगृहातील समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या माला व गांधारी या दोन्ही मानसकन्यांनी ...

Anandela Vazhazar's children's bedroom with the result of H.Sc. | बारावीच्या निकालाने वझ्झरचे बालसुधारगृह आनंदले

बारावीच्या निकालाने वझ्झरचे बालसुधारगृह आनंदले

उत्साह : शंकरबाबांच्या माला-गांधारी उत्तीर्ण
नरेंद्र जावरे परतवाडा
वझ्झर येथील स्व. अंबादासपंत मतिमंद अंध-अपंग, बाल सुधारगृहातील समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या माला व गांधारी या दोन्ही मानसकन्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रथमश्रेणी टक्केवारीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाने बालसुधारगृहात आनंद संचारला आहे.
निराधार, निराश्रित, अपंग अंध मुला-मुलींचे आई-वडिल म्हणजे शंकरबाबा होय. बेवारस मुलांना उचलून जगण्याचा अधिकार व शिक्षणाचा मार्ग दाखविणाऱ्या शंकरबाबा पापळकर यांच्या माला व गांधारी या दोन्ही मानसकन्यांनी अंध असताना डोळस विद्यार्थ्यांसोबत बारावीची परीक्षा दिली होती. ७१ टक्के, तर माला ७२ टक्के गुण घेऊन प्रथम श्रेणीत आली. परतवाडा येथील आईएस गर्ल्स शाळेच्या दोघी विद्यार्थिनी आहेत. अधीक्षिका प्रमिला नघाटे, श्रीनाथ, तुरखेडे, धोपटे, काटोलकर, मानकर आदींचे सहकार्य लाभले. मालासाठी नूतन भिडकर व गांधारीसाठी काजल दाने या विद्यार्थिनी परीक्षेत लेखन मदतनीस होत्या.

मालाला आयएएस व्हायचंय
माला हिला उच्च शिक्षण घेत आयएएस अधिकारी तर गांधारीला संगीताची आवड असल्याने संगीततज्ज्ञ व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे उच्च शिक्षण घेत बाबांचे नाव आणखी मोठे करायचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
‘लोकमत’मुळे आईची अडचण हटली
माला व गांधारी दहावीच्या शालांत परीक्षेत असताना त्यांचा निकाल आईच नसल्याने बोर्डाने थांबविला होता. लोकमतने बोर्डाच्या लक्षात ही बाब आणून दिली होती.

माझ्या दोन्ही मुली मोठ्या टक्केवारीने उत्तीर्ण झाल्या. यापेक्षा मोठा आनंद याबाबाला काय हवा. सर्वांचा आशिर्वाद त्यांच्या पाठिशी आहे.
- शंकरबाबा पापळकर, ज्येष्ठ समाजसेवक, अचलपूर

Web Title: Anandela Vazhazar's children's bedroom with the result of H.Sc.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.