डी-२ एचवर भर : ग्राहकांसह केबल आॅपरेटरची दाणादाण अमरावती : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील केबल टिव्ही धारकांना सेट टॉप बसविण्यासाठी ३१ डिसेंबर २०१५ ही अंतिम मुदत होती. ज्या केबल चालकांनी सेट टॉप बॉक्स बसविले नाहीत. त्यांची सेवा खंडित करण्यात आल्याने गोंधळात भर पडली आहे. ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजताच्या ठोक्यावर केबल चालकांचे अॅनालॉग सिग्नल बंद करण्यात आल्याने लक्षावधी घरातील टीव्ही संच शोपिस बनले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सेट टॉप बॉक्सच्या मागणीत भर पडली. टीव्हीचे केबल जोडणी बंद झाल्याने नागरिकांनी केबल आॅपरेटरकडे धाव घेतली. मात्र, मागणी आवाक्याबाहेर गेल्याने केबल आॅपरेटरचीसुध्दा मोठी दाणादाण उडाली आहे. यावर मात करण्यासाठी शहरातील अनेकांनी सेट टॉप बॉक्स लावून न घेता डि-२ एचला पसंती दिली आहे. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रायलाच्या अधिसूचनेनुसार ३१ डिसेंबरपर्यंत बसविण्याचे आवाहन केले होते. मात्र, अनेक ठिकाणी संबंधित केबल सेवा पुरविणारी कंपनी, बहुविध यंत्रणा परिचालक (एसएमओ) आणि स्थानिक केबल परिचालक यांच्याद्वारे या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. अशा केबल चालकांचे अॅनालॉग सिग्नल बंद करण्यात आले आहे. सेट टॉप बॉक्सच्या मागणीत भर अमरावती : टीव्ही डिजीटायझेशन टप्पा तीन अंतर्गत सेट टॉप बॉक्स बसविला नसेल अशा वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद करण्यात आले. महसुल विभागाच्या कारवाईने टीव्हीवर संक्रांत आली असून केंद्र सरकारने पुन्हा मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने सेट टॉप बॉक्सच्या मागणीत भर पडली आहे. २८ लाख लोकसंख्या असलेल्या अमरावती जिल्ह्यामध्ये केवळ ५७ हजार घरामध्ये केबल जोडणी होती. त्यापैकी ३१ डिसेंबर अखेर केवळ १८ हजार ७१२ ग्राहकांपर्यंतच सेटटॉप बॉक्स पोहचले आहेत. उल्लेखनीय म्हणजे संबधीत एसएमओ सेटटॉप बॉक्सचा पुरवठा वेळेत न करू शकल्याने जिल्ह्यातील लाखो दर्शकांना टीव्ही कार्यक्रमांपासून वंचित राहावे लागत आहे. (प्रतिनिधी)
अॅनालॉग सिग्नल बंदने गोंधळात गोंधळ
By admin | Updated: January 3, 2016 00:27 IST