शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

महाराष्ट्र देशासाठी प्रेरणा; प्रयोगशाळा होऊ देऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 11:10 IST

योगी आदित्यनाथ यांचे आवाहन : परतवाडा येथे प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : महाराष्ट्र देशासाठी प्रेरणास्रोत राहिले आहे, सतत राहील. या राज्याला प्रयोगशाळा होऊ द्यायची नाही. हे आता तुमच्या हाती आहे. एक चूक काँग्रेसच्या 'हाता'ने १९४७ मध्ये केली. आपल्या स्वार्थासाठी मुस्लीम लीगसारख्या संघटनांशी समझोता करून देशाचे विभाजन केले गेले. आतादेखील 'बटेंगे तो कटेंगे' हे लक्षात ठेवा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परतवाडा येथे मतदारांना केले. अचलपूर, मेळघाट व मोर्शी मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांची यावेळी सभा झाली.

योगी पुढे म्हणाले, २०१४ पूर्वी पाकिस्तान, चीन भारतात शिरत होता. ठिकठिकाणी विस्फोट घडून येत होते. मी आवाज उठवत होतो, तर त्यावेळी काँग्रेसचे सरकार आणि यूपीएचे नेते 'तुम्ही बोलू नका, आमचे संबंध खराब होतील' असे बजावत होते. आता आपण बघत असाल, ये नया भारत है. आता जर कोणी अशी गडबड केली, तर त्याची एकच यात्रा निघते, ती आहे राम नाम सत्य है. 

भाजपचे अचलपूर मतदारसंघाचे उमेदवार प्रवीण तायडे, मेळघाटचे उमेदवार केवलराम काळे व मोर्शी मतदारसंघाचे उमेदवार उमेश यावलकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी आयोजित योगी आदित्यनाथ यांच्या सभेत मंचावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार नवनीत राणा, खा.डॉ. अनिल बोंडे, सुनील खानजोडे, कुंदन यादव यांसह मान्यवर आणि तिन्ही उमेदवार उपस्थित होते. 

अयोध्यात या, आम्ही स्वागत करू योगी आदित्यनाथ म्हणाले, तुमच्यापैकी किती जण आतापर्यंत अयोध्याला आले आहेत? हात कमी उंचावल्याचे बघून ते म्हणाले, तुम्ही अयोध्याला या, आम्ही तुमचे स्वागत करू. यावेळी 'जय श्रीराम'चे नारे निनादले.

खरगेजी, में एक योगी हूँ मागील तीन दिवसांपासून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे माझ्यावर खूप नाराज होत आहेत. मी अशा शब्दांचा वापर का करीत आहे? मी त्यांना सांगू इच्छितो की, खरगेजी मी एक योगी आहे और माझ्यासाठी देश प्रथम आहे. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही हीच दृष्टी आहे, तर काँग्रेस तुष्टीकरणाच्या नीतीवर विसंबून आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४yogi adityanathयोगी आदित्यनाथnavneet kaur ranaनवनीत कौर राणाAmravatiअमरावती