अमृत योजनेचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By Admin | Updated: October 16, 2016 00:17 IST2016-10-16T00:17:17+5:302016-10-16T00:17:17+5:30
शहरातील १२२ कोटींच्या अमृत योजनेचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

अमृत योजनेचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
अमरावती : शहरातील १२२ कोटींच्या अमृत योजनेचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री मुंबईतून व्हिडीओ कान्फरंसिंगद्वारे या योजनेचा शुभारंभ करतील. त्यासाठी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात रविवारी सायंकाळी ५ वाजता छोटेखानी समारंभ आयोजित केला आहे.
आयुक्त हेमंत पवार यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अमृत योजनेतून अमरावतीसाठी आ.सुनील देशमुख यांच्या प्रयत्नाने १२२ कोटींचा निधी अमरावती महापालिकेला मिळाला आहे. अमरावती महापालिकेसह अचलपूर या अ वर्ग नगरपालिकेलाही अमृत योजनेतून निधी मिळाला आहे. (प्रतिनिधी)