अमृत अभियानात अमरावती, अचलपूरचा होणार विकास

By Admin | Updated: October 16, 2015 00:44 IST2015-10-16T00:44:57+5:302015-10-16T00:44:57+5:30

शहरात नागरी सुविधांची निर्मिती करण्यासाठी केंद्र पुरस्कृत अमृत योजनेची (अटल मिशन फॉर रेजुव्हेशन अ‍ॅन्ड अर्बन ट्रान्सफार्मेशन)

Amrit, Amravati, Achalpur will be developed | अमृत अभियानात अमरावती, अचलपूरचा होणार विकास

अमृत अभियानात अमरावती, अचलपूरचा होणार विकास

केंद्राची योजना : गरिबांसाठी नागरी सुविधांची निर्मिती
अमरावती : शहरात नागरी सुविधांची निर्मिती करण्यासाठी केंद्र पुरस्कृत अमृत योजनेची (अटल मिशन फॉर रेजुव्हेशन अ‍ॅन्ड अर्बन ट्रान्सफार्मेशन) अंमलबजावणी करण्याचे आदेश मंगळवारी नगरविकास प्रशासनाने दिले आहेत.
राज्यातील ४३ शहरांची निवड या मिशनसाठी करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती महापालिका व अचलपूर नगरपालिकेचा समावेश आहे. या शहरात पाणीपुरवठा, मल नि:सारण, नागरी परिवहन पुरविणे व शहरात गरिबांसाठी सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. शहरातील नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणे यासाठी शासनाकडून नेहमीच प्राधान्य दिले जाते. शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलीत निकषानुसार पाणीपुरवठा करणे, शहरामध्ये मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे, शहरातील परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करुन प्रदूषण कमी करणे, शहराच्या स्वच्छतेकरिता मलनि:सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्य जल वाहिनीची व्यवस्था करणे, शहरात मोकळी जागा, हरितक्षेत्र आदी सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाने अमृत अभियान राबविण्याचे निर्देश नगरविकास विभागाचे उपसचिव सं.श. गोखले यांनी मंगळवारी दिले.
यासाठी राज्य व जिल्हास्तर समिती गठित करण्याच्या सूचना शासनाने दिल्यात. यामध्ये शहराचा सेवास्तर अंतर, समता बांधणी, नागरी सुविधांची पूर्तता व वित्तीय नियोजन याविषयी स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अमृत अभियानात ही कामे होणार
पाणीपुरवठा - पाणीपुरवठा वृध्दीबदल, जलशुध्दीकरण प्रक्रिया यंत्रणा, मिटरींग, जुन्या योजनांचे पुनपुज्जजीवीकरण, जलस्त्रोताचे पुनपुज्जजीवीकरण, भूजल पातळी वाढीचे उपक्रम, दुर्गम शहरे विशेष पाणीपुरवठा योजना.
मलनिस्सारण - विकेंद्रित भुयारी गटार योजना, जुन्या मलनि:सारण योजनांचा वृध्दीबद्दल, मलप्रक्रिया केंद्रे, जुन्या मलनि:सारण योजनांचे व मलप्रक्रिया केंद्राचे पुनरुज्जीवन, पाण्याचा पुनर्वापर
मलप्रक्रिया - मलप्रक्रिया व्यवस्थापन, गटारे व सेप्टिक टँक यांची यांत्रिक व जैविक व्यवस्था.
पर्जन्य जलवाहिनी - पूरनिर्मूलनासाठी पर्जन्य जलवाहिनी बांधकाम.
नागरी वहतूक - बसेसे, पदपथ, वॉकवेज, साईड वॉक, फ्रुट ओव्हर ब्रिज, नॉन मोटोराईज्ड ट्रान्सपोर्ट, बहुमजली वाहनतळ, बस रॅपीड ट्रांझिट सिस्टीम.

Web Title: Amrit, Amravati, Achalpur will be developed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.