अमरावतीचा भाग्यविधाता!
By Admin | Updated: May 16, 2015 00:48 IST2015-05-16T00:48:52+5:302015-05-16T00:48:52+5:30
विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावतीला महानगराचा दर्जा मिळाला हे खरे.

अमरावतीचा भाग्यविधाता!
गणेश देशमुख अमरावती
विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावतीला महानगराचा दर्जा मिळाला हे खरे. तथापि, महापालिकेचे पोटार्थी प्रशासन आणि बेशिस्त शासनाच्या कारभारात बुजलेला महानगराचा चेहरा कोरून त्याला अस्तित्व प्रदान करणारा शिल्पकार या शहराच्या वाट्याला आलाच नव्हता. सर्वत्र निराशेचा काळोख गडद असताना अचानक सूर्योदय व्हावा तसा चंद्रकांत गुडेवारांचा अमरावती शहरात आशादायी प्रवेश झाला. अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच गुडेवार यांनी कारवाईचा जो अविश्वसनीय धडाका सुरू केला तो बघून शहराला भाग्यविधाता मिळाल्याचा आनंद सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर अलगद टिपता येतो.
'टॉक आॅफ दी टाऊन'
हल्ली अमरावती शहरात एकच चर्चा आहे, ती म्हणजे चंद्रकांत गुडेवार आणि त्यांची कार्यशैली! गुडेवार हे त्यांच्या प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर कार्यप्रणालीमुळे 'टॉक आॅफ दी टाऊन' ठरले आहेत. नायक या हिंदी चित्रपटातील 'सामान्यांचा मुख्यमंत्री' या भूमिकेतील अनिल कपूरप्रमाणेच गुडेवार हे केवळ महिनाभरात 'सामान्यांचे आयुक्त' ठरले आहेत. लोकांमध्ये गुडेवारांबाबत आता औत्सुक्य निर्माण झाले आहे. एरवी अधिकाऱ्यांबाबत अविश्वास आणि अपशब्द व्यक्त करणारी जनता गुडेवार यांना भेटण्यास उत्सुक होते, अभिनंदन करू इच्छिते, ही गुडेवारांच्या लोकाभिमुख कार्यप्रणालीची पावती होय.
सामान्य तरीही निडर!
बोलताना ग्रामीण भाषेचा वापर करणारे, राहणीमान नीटनेटके ठेवताना त्यात आवर्जून सामान्य 'टच' जपणारे, चष्म्याची फ्रेम असो वा कमरेचा पट्टा- सर्वसामान्यांप्रमाणेच वस्तू वापरणारे चंद्रकांत गुडेवार हे लोकांना त्यांच्यातीलच एक भासतात. ते कुणाला एकटे भेटलेच तर महापालिका आयुक्त असल्याचा जराही दर्प त्यांच्या व्यक्तिमत्त्वात येणार नाही, इतका त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सामान्यपणा रूळलेला! बाह््यांगी सामान्य दिसणाऱ्या या व्यक्तिमत्त्वामागे मात्र एक निडर, चाणाक्ष आणि सतर्क अधिकारी सतत कार्यरत असतो.
महिनाभरात चंद्रकांत गुडेवार यांनी केलेल्या कारवाईचा हा आलेख
सांस्कृतिक भवन आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आठ जणांविरुद्ध फौजदारी कारवाई
स्वच्छता विभागप्रमुख देवेंद्र गुल्हाने यांचे निलंबन
क्रीडा विभागातील कारकून
प्रशांत पवार यांचे निलंबन
बाजार व परवाना विभाग पथकाचे अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी,
लवकरच फौजदारी कारवाई
तक्रारप्राप्त चार इमारतींना बांधकाम पाडण्याच्या नोटीशी
कल्याण नगरातील नियमबाह्य चार मजली 'फ्लॅट स्किम'चे बांधकाम पाडले
हॉटेल 'महेफिल इन'ने विनापरवानगी खोदकाम केल्यामुळे पाच लक्ष रुपयांचा दंड आणि पोलिसात तक्रार
शमिम बानो सादिक आयडिया
या नगरसेविकेचे सदस्यत्व रद्द