शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

अमरावतीच्या मुलीचे आग्य्रातून अपहरण, मावशीच्या सुनेविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:05 IST

दोन महिन्यांची असताना आई मुलीला सोडून गेली. १५ वर्षांनंतर मावशीच्या सुनेने त्या मुलीला आग्रा येथे नेऊन आईशी भेट घालून दिली. दरम्यानच त्या मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार पुढे आला. मुलीच्या शोधात असणाऱ्या वडिलांनी राजापेठ पोलिसात धाव घेतली. मात्र, तेथील पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले नाही.

ठळक मुद्देवडिलांची पोलीस उपायुक्तांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन महिन्यांची असताना आई मुलीला सोडून गेली. १५ वर्षांनंतर मावशीच्या सुनेने त्या मुलीला आग्रा येथे नेऊन आईशी भेट घालून दिली. दरम्यानच त्या मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार पुढे आला. मुलीच्या शोधात असणाऱ्या वडिलांनी राजापेठ पोलिसात धाव घेतली. मात्र, तेथील पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. त्यामुळे अखेर वडिलांनी सोमवारी पोलीस उपायुक्तांकडे दाद मागितली. त्यांनी राजापेठ पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी अपहरणाचा गुन्हा नोंदविला.सिद्धार्थनगरातील रहिवासी एका ५० वर्षीय व्यक्तीची मुलगी दोन महिन्यांची असताना तिची आई सोडून गेली. आईने आग्रा येथील एका इसमाशी संसार थाटला. दरम्यान मुलीचे वडील बेलपुºयात भाड्याच्या खोली करून चौकीदाराची नोकरी करू लागले. बेलपुºयातच मुलीची मोठी मावशी राहत होती. आॅक्टोबर २०१८ मध्ये एके दिवशी मावशीची सून मुलीच्या घरी आली. आईची भेट करून देण्याचे सांगून तिने मुलीला आग्रा येथे नेले. त्यानंतर मावशीची सून तेथून परत अमरावतीत आली. दरम्यान दोन ते तीन महिने ती मुलगी आग्रा येथे आईकडे राहिली. त्यानंतर मावशीच्या सुनेने मुलीला आग्ºयाहून परत अमरावतीत आणले. १० जून रोजी मावशीच्या कोणालाही न सांगता त्या मुलीला पुन्हा आग्रा येथे नेले व तेथेच सोडून सून अमरावतीत परतली. दरम्यान मुलगी घरात नसल्याचे पाहून वडिलांनी शोधाशोध सुरू केली. त्यांनी मुलीबद्दल नातेवाईकांकडे चौकशी केली. राजापेठ पोलिसात तक्रार देण्यास गेले. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदविली नाही. त्यांनी मावशीच्या सुनेला चौकशीकरिता बोलाविले होते. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आग्रा येथील नातेवाईकांशी संपर्क साधला. मुलीच्या आईच्या दुसºया पतीसोबत संपर्क साधून मुलीबाबत विचारणा केली. त्यावेळी धक्कादायक बाब पुढे आली. मुलगी तेथूनही बेपत्ता असल्याचे वडिलांना कळले. १५ जून २०१९ रोजी ती मुलगी आग्राहून बेपत्ता झाली. तिने रात्रीच्या वेळी घराचे दार बाहेरून बंद करून पलायन केले. यासंदर्भात आग्रा पोलिसांत तक्रार नोंदविल्याची माहिती तिच्या आईच्या दुसºया पतीने पोलिसांनाही दिली. या घडलेल्या प्रकारसंदर्भात मुलीचे वडील व आत्याने सोमवारी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली. त्यांनीही आग्रा येथील त्या व्यक्तीशी संपर्क साधून माहिती घेतली. या घटनेच्या अनुषंगाने डीसीपी सोळंके यांनी राजापेठचे प्रभारी ठाणेदार दिलीप चव्हाण यांना अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याचे सूचित केले. त्यानुसार मुलीचे वडील राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले. याप्रकरणात पोलिसांनी भावना नामक मावशीच्या सुनेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.भावना पतीसह पसारमुलीच्या मावशीची सून बेलपुऱ्यातील रहिवासी ठिकाणावरून पसार झाली आहे. राजापेठ पोलीस तिचा शोध घेत आहेत. मुलीला आग्रा पोहोचून देण्यात व तेथून परत आणण्यात भावनाने पुढाकार घेतला होता. तिच्या या पुढाकाराचे गुपित काय आहे, हे भावनाला अटक केल्यानंतर पुढे येईल.