‘एक जखम सुगंधी’ला अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: October 20, 2015 00:21 IST2015-10-20T00:21:32+5:302015-10-20T00:21:32+5:30
अंबा फेस्टिव्हल २०१५ च्या पाचव्या पुष्यात गझलनवाझ भीमराव पांचाळेंच्या ‘एक जखम सुगंधी’ कार्यक्रमाला अमरावतीकरांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला.

‘एक जखम सुगंधी’ला अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री अंबा फेस्टिव्हल : ‘अंंदाज आरशाचा..’ गझलेवर रसिकांच्या टाळ्या
अमरावती : अंबा फेस्टिव्हल २०१५ च्या पाचव्या पुष्यात गझलनवाझ भीमराव पांचाळेंच्या ‘एक जखम सुगंधी’ कार्यक्रमाला अमरावतीकरांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दिला. गझलकारांच्या रचना, तबला वादक देवेंद्र यादव यांच्या तबला, हार्मोनियमवर सुधाकर अंबुस्कर यांची साथ, प्रशांत अग्निहोत्रींचा बासरीवरील स्वर व संदीप कपूर यांची गिटारच्या सहयोगातून रंगलेल्या स्वर मैफलीमध्ये रसिक अक्षरक्ष: धुंद होऊन गेले होते.
संत ज्ञानेश्वर सास्कृतिक भवनामध्ये रविवारी अंबा फेस्टिवलच्या माध्यमातून गझल मैफलीमध्ये भीमराव पांचाळे यांनी ‘अंदाज आरशाचा...’ या गझलेनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर गझल सादर करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आ. रवी राणा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, सागर गावंडे यांनी केले. आमदार सुनील देशमुख, मिलिंद चिमोटे व अनेक मान्यवरांसह रसिकांच्या उपस्थितीने सांस्कृतिक भवन हाऊ सफुल्ल झाले होते.
सकाळच्या सत्रात रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान समिती व अंबा फेस्टिवलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या आयोजनासाठी शैलेश चौरसिया व सदस्य ढोक काका, जोशी, राहुल सावरकर, सोनट साहेब, प्रणय कुलकर्णी उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात केशव डान्स अॅकॅडमीतर्फे श्री अंबा डान्स टॅलेंट एकल नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम पार पडला. १२ वर्षांखालील अ गट, १२ ते १८ वर्षे वयोगटातील ब गट व अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कोरीओग्राफर सुभाष नायडू व प्रणय यांनी केले. (प्रतिनिधी)