शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अमरावतीकरांनी अनुभवला चंद्रग्रहणाचा क्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:25 PM

भारतातून दिसणाऱ्या पहिल्या चंद्रग्रहणाचे विलोभनीय क्षण अमरावतीकरांनी मंगळवारी रात्री अनुभवले. रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी सुरू झालेले चंद्रग्रहण पहाटे ४ वाजता संपले.

अमरावती : भारतातून दिसणाऱ्या पहिल्या चंद्रग्रहणाचे विलोभनीय क्षण अमरावतीकरांनी मंगळवारी रात्री अनुभवले. रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी सुरू झालेले चंद्रग्रहण पहाटे ४ वाजता संपले.ग्रहण पाहण्यासाठी कसल्याही प्रकारच्या चष्म्याची किंवा दुर्बिणीची गरज नव्हती. त्यामुळे हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता आले. मराठी विज्ञान परिषदेचे प्रवीण गुल्हाने यांच्या दीप नगरातील घरावरून खंडग्रास चंद्रग्रहणातील विलोभनीय क्षणाचा आनंद अनेकांनी घेतला. चंद्रावर पडणारी छाया हळूहळू वाढल्याचे पाहून अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. मध्यरात्री ३ वाजून १ मिनिटांनी चंद्रग्रहणाची सर्वोच्च ग्रहणस्थिती होती. पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी चंद्र सावलीतून बाहेर पडला. भारतातून दिसणारे हे वर्षातले एकमेव चंद्रग्रहण असल्यामुळे अनेक खगोलप्रेमींनी या ग्रहणाचा अनुभव घेतला. चंद्रग्रहण पाहताना उपस्थितांना मराठी विज्ञान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी मराठी विज्ञान परिषदेचे प्रवीण गुल्हाने, विजय गिरुळकर व रवींद्र खराबे उपस्थित होते.