लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता लागू केलेल्या संचारबंदीत तब्बल आठवडाभरानंतर ९ तासांची शिथिलता देण्यात आली. त्यामुळे जातीय विद्धेषाचे जहाल कचाट्यात अडकलेल्या अमरावतीकरांनी मोकळा श्वास घेतला. मुठभर लोकांच्या अविवेकी, क्षणिक व निर्णायकी भूमिकेमुळे अवघे शहर वेठीस धरले गेले होते. अफवांचे पीक आले. त्यामुळे कधी नव्हे तो थेट इंटरनेट बंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सामूहिक प्रयत्नांमुळे शहर शांततेकडे वाटचाल करीत आहे. पोलिसांच्या इंटेलिजन्स’चा तसे निरीक्षण असल्याने संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. १२ व १३ नोव्हेंबर रोजी ज्याठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या, त्या अतिसंवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शनिवारी सकाळी ९ ते ६ या कालावधीत संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली. सर्व दुकाने उघडली. रस्ते बोलकी झाली. अन् शहर दहशतीतून बाहेर पडत असल्याचा प्रत्यय आला. खासगी व राष्ट्रीयीकृत बॅंक व्यतिरिक्त सहकारी बॅंकांचे कामकाज पूर्ववत झाले. तर अनेकांनी बाजारपेठ गाठून लग्नसराईसाठी खरेदी उरकून घेतली.
बाजार समिती, ट्रान्सपोर्टला सूटकृषी उत्पन्न बाजार समितीत अन्नधान्य, फळभाज्या आदी जीवनावश्यक वस्तुंची आवक होते. त्यामुळे २१ नोव्हेंबरपासून नवे व जुने बाजार समितीत माथाडी कामगार, वाहने तसेच इतवारा येथे ट्रान्सपोर्ट गल्ली संचारबंदीतून वगळण्यात आले आहे.
सक्करसाथ : ५ ते ८.३० पर्यंत सूटस्थानिक सक्करसाथमध्ये माल वाहतूक करणारे अनेक वाहनांची ये-जा सुरु राहते. त्यामुळे संचारबंदीत सक्करसाथ परिसरात सकाळी ५ ते सायंकाळी ८.३० या दरम्यान सूट देण्यात आली आहे. गोदामात येणारा माल खाली करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.