जिल्हास्तरावर झेडपी देणार आता आदर्श कर्मचारी पुरस्कार!

By जितेंद्र दखने | Updated: December 9, 2024 21:22 IST2024-12-09T21:22:18+5:302024-12-09T21:22:42+5:30

सीईओंची संकल्पना : दरवर्षी ३० कर्मचाऱ्यांची होणार सन्मान

Amravati: ZP will now give ideal employee award at the district level! | जिल्हास्तरावर झेडपी देणार आता आदर्श कर्मचारी पुरस्कार!

जिल्हास्तरावर झेडपी देणार आता आदर्श कर्मचारी पुरस्कार!

अमरावती : जिल्हा परिषद आदर्श शिक्षक, आदर्श ग्रामसेवक पुरस्काराच्या धर्तीवर आता अमरावती जिल्हा परिषदे मार्फत आदर्श कर्मचारी पुरस्कार देण्याचा संकल्पना मुख्यकार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी मांडली आहे. यानुसार दरवर्षी १४ पंचायत समितीमधून प्रत्येक एक आणि मुख्यालयातील विविध विभागातून प्रत्येकी एका अशा ३० कर्मचाऱ्यांना झेडपी मारफत आदर्श कर्मचारी पुरस्काराने गौरविले जाणार आहे. यंदापासून ही संकल्पना अंमलात येणार असून येत्या १६ डिसेंबरला पहिला पुरस्कार सोहळा जिल्हा परिषदे मार्फत पार पडणार आहे.
 
जिल्हा परिषदेत सीईओ संजिता महापात्र याच्या संकल्पनेत पहिल्यांदाच राज्यात अमरावती जिल्हा परिषदेने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील ३० कर्मचाऱ्यांची निवड करून यापुढे दरवर्षी हा पुरस्कार संविधानदिनी २६ नोव्हेंबरला बहाला केला जाणार आहे. या पुरस्कारासाठी जीएडीकडे अर्ज प्राप्त झाले आहे. शिक्षक,ग्रामसेवक व गुणवंत कर्मचाऱ्यांना शासनाकडून दरवर्षी राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर सुद्धा आदर्श पुरस्काराने गौरविले जाते. मात्र प्रशासनात स्थानिक पातळीवर उत्कृष्ठ काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची कौतुकाची थाप पडत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर या कर्मचाऱ्याचा गौरव करून प्रोत्साहन देण्याचे दृष्ट्रीने झेडपी सीईओ संजीता महापात्र यांनी ही नवी संकल्पना मांडून त्याची अंमलबजावणी यंदापासूनच सुरू केली आहे. 

त्यानुसार जिल्हास्तरावर यावर्षीपासूनच ३० आदर्श कर्मचाऱ्यांना पुरस्कारासाठी निवडले जाणार आहे. यासाठी सात सदस्यीस समितीचे गठण केले आहे. या समितीचे प्रमुख स्वत: सीईओ राहणार असुन अतिरिक्त सीईओ हे उपाध्यक्ष तर सदस्य म्हणुन मुख्य लेखा व वित्त अधिकारी, बांधकामचे कार्यकारी अभियंता, जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला बाल कल्याण विभाग व सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ यांचा समावेश केला आहे. आदर्श कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविले जाणार आहे.

याप्रमाणे निवडले जाणार पुरस्कारार्थी
जिल्हा परिषद मार्फत दरवर्षी ३० कर्मचाऱ्यांची पुरस्काराासाठी निवड केली जाणार आहे. यामध्ये १४ पंचायत समितीस्तरावर १४ कर्मचारी, मुख्यालयातील जीएडीमधून ३ कर्मचारी, बांधकामचे २, आरोग्य ३, महिला बालकल्याण १, वित्त १,कृषी व पशुसंवर्धन मधून प्रत्येकी १, ग्रामिण पाणी पुरवठा १, सिंचन १ व शिक्षण विभागातील एका कर्मचाऱ्याची हा पुरस्कार दिला जाणार आहे.

Web Title: Amravati: ZP will now give ideal employee award at the district level!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.