‘स्मार्ट सिटी’साठी अमरावती वेटिंगवर

By Admin | Updated: January 29, 2016 03:59 IST2016-01-29T03:59:28+5:302016-01-29T03:59:28+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या पहिल्या टप्प्यात अमरावती शहराची निवड

Amravati waiting for 'smart city' | ‘स्मार्ट सिटी’साठी अमरावती वेटिंगवर

‘स्मार्ट सिटी’साठी अमरावती वेटिंगवर

अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या पहिल्या टप्प्यात अमरावती शहराची निवड करण्यात आली नाही. मात्र, राज्यातील पुणे, सोलापूर या शहरांची निवड झाली आहे, हे विशेष. अमरावतीच्या प्रस्तावामध्ये जागेव्यतिरिक्त इतर उणिवा असल्याची माहिती आहे.
केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत ‘स्मार्ट सिटी’ योजनेत निवड झालेल्या २० शहरांची नावे घोषित करताना महाराष्ट्रातून पुणे व सोलापूर शहराची निवड झाल्याचे जाहीर केले. पहिल्या टप्प्यात २० शहरांची नावे घोषित केली असली तरी महाराष्ट्राची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर या शहरांचादेखील समावेश करण्यात आला नाही. ‘स्मार्ट सिटी’ योजनेत ९८ शहरांनी सहभाग घेतला आहे. अमरावतीत मुबलक पाणी पुरवठा, योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने जागेची उपलब्धता आदी भक्कम बाजू असताना पहिल्या टप्प्यात अमरावतीची निवड झाली नसल्याने अमरावतीकरांचा हीरमोड झाला आहे. अमरावती शहराचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश व्हावा, यासाठी आयुक्त चंद्रकांत गुडेवार, महापौर चरणजितकौर नंदा यांनी देशातील प्रमुख शहरांना भेटी सुध्दा दिल्या आहेत. ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या अनुषंगाने स्थानिक महादेव खोरी परिसरातील गौरक्षण टेकडीवर जागेची निवड सुध्दा करण्यात आली होती. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात प्रत्येकी ४० शहरांची ‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी निवड केली जाईल, असे ना. नायडू यांनी स्पष्ट केले. निवड झालेल्या शहरांना दरवर्षी १०० कोटी रुपये मिळणार आहेत. (प्रतिनिधी)

मुख्य सचिव घेणार व्हिडीओ कॉन्फरन्स
४‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या अनुषंगाने शुक्रवारी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे महापालिका अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यात नागपूर, मुंबई, अमरावती महापालिकांचा समावेश राहील. प्रस्तावात असलेल्या बाजू, उणिवांबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.

पहिल्या टप्प्यात अमरावती शहराचे नाव समाविष्ट झाले नसले तरी दुसऱ्या टप्प्यात नक्कीच निवड होईल. प्रस्तावात बाजू भक्कमपणे आहे. मुबलक पाणीपुरवठा, जागेची उपलब्धता या बाजू जमेच्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात नक्कीच नाव घोषित होईल.
- चंदन पाटील, उपायुक्त, महापालिका.

Web Title: Amravati waiting for 'smart city'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.