Amravati: तूर पहिल्यांदा उच्चांकी @ ११, ४००; शेतकऱ्यांजवळची तूर संपताच बाजार समितीत विक्रमी भाव
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 19, 2023 00:22 IST2023-08-19T00:22:11+5:302023-08-19T00:22:52+5:30
Amravati: तुरीला हंगामापासूनच उच्चांकी भाव मिळाला आहे. त्यातच आता शेतकऱ्यांजवळील साठवणूक केलेली तूर संपल्यानंतर आवक कमी झाली व मागणी वाढली आहे. त्यामुळे तुरीला विक्रमी ११३८७ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे.

Amravati: तूर पहिल्यांदा उच्चांकी @ ११, ४००; शेतकऱ्यांजवळची तूर संपताच बाजार समितीत विक्रमी भाव
- गजानन मोहोड
अमरावती - तुरीला हंगामापासूनच उच्चांकी भाव मिळाला आहे. त्यातच आता शेतकऱ्यांजवळील साठवणूक केलेली तूर संपल्यानंतर आवक कमी झाली व मागणी वाढली आहे. त्यामुळे तुरीला विक्रमी ११३८७ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे.
नवीन तूर बाजारात यायला सहा महिन्यांचा कालावधी आहे. याशिवाय गतवर्षी झालेल्या अतिपावसाने तुरीच्या उत्पादनात कमी आलेली आहे. देशात सगळीकडे हीच परिस्थिती असल्याने तुरीची मागणी वाढताच भाव कडाडले आहेत. येथील बाजार समिती एक प्रकारे तुरीचे हब बनली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक भाव मिळत असल्याने व इतर तालुक्यांच्या तुलनेत जास्त भाव असल्याने येथे तुरीची मोठी आवक राहते; परंतु सध्या शेतकऱ्यांजवळ साठवणूक केलेली तूर नसल्याने बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने दरवाढ झालेली आहे.