अमरावती-सुरत फास्ट पॅसेंजर २७ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:25 IST2021-02-21T04:25:27+5:302021-02-21T04:25:27+5:30

बडनेरा : अमरावती-सुरत फास्ट पॅसेंजरला रेल्वे बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. येत्या २७ फेब्रुवारीपासून अमरावती रेल्वेस्थानकाहून ही गाडी धावणार ...

Amravati-Surat fast passenger from 27 | अमरावती-सुरत फास्ट पॅसेंजर २७ पासून

अमरावती-सुरत फास्ट पॅसेंजर २७ पासून

बडनेरा : अमरावती-सुरत फास्ट पॅसेंजरला रेल्वे बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. येत्या २७ फेब्रुवारीपासून अमरावती रेल्वेस्थानकाहून ही गाडी धावणार आहे. आठवड्यातून दोन दिवस येणे व जाणे असा प्रवास या गाडीचा राहणार आहे.

कोरोना संसर्गामुळे गतवर्षी बंद करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या हळूहळू रुळावर येण्यास सुरुवात झाली. २२ मार्च २०२० रोजी थांबलेली अमरावती-सुरत फास्ट पॅसेंजर ही गाडी येत्या २७ फेब्रुवारीपासून धावणार आहे. आठवड्यातील शनिवार व सोमवारी या दोन दिवशी अमरावतीहून धावेल, तर शुक्रवार व रविवारी सुरतहून अमरावतीसाठी ही गाडी धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली. आरक्षण घेणे बंधनकारक आहे. या गाडीमुळे व्यापारी वर्गाची सोय झाली आहे. खासदार नवनीत राणा यांनी ही गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. रेल्वे गाड्यांमधून प्रवाशांची संख्या वाढली आहे.

Web Title: Amravati-Surat fast passenger from 27