अमरावती विभागात दीड हजार लीटरने वाढली दुधाची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 17:04 IST2017-08-20T17:03:47+5:302017-08-20T17:04:00+5:30
जिल्ह्यात सात ते आठ हजार लीटर दुधाचे दररोज संकलन होत असून चार ते पाच हजार लीटर दुधाची अमरावती येथील शासकीय दुग्धविकास केंद्रात येत आहे.

अमरावती विभागात दीड हजार लीटरने वाढली दुधाची आवक
अमरावती, दि. 20 - शासकीय दुग्ध विकास केंद्राच्यावतीने अधिकृत नोंदणीकृत दुग्ध सेवा सहकारी सोसायटीतून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सात ते आठ हजार लीटर दुधाचे दररोज संकलन होत असून चार ते पाच हजार लीटर दुधाची अमरावती येथील शासकीय दुग्धविकास केंद्रात येत आहे. मे-जून महिन्याच्या तुलनेत दीड हजार लीटरने दुधाची आवक वाढल्याची माहिती येथील जिल्हा दुग्धविकास अधिकारी एस.बी.जांभुळे यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील दुुग्धविकास संस्थांना जळगाव येथील केंद्र जवळ पडत असल्याने सदर २ ते ३ हजार लीटर दुधाचे संकलन त्याठिकाणी होत आहे. असेच विविध ठिकाणी संकलित झालेले दररोज चार ते पाच हजार लीटर दूध बाहेरून जिल्ह्यात येते. त्यावर जिल्हा दुग्धविकास केंद्रात प्रक्रिया करून हे पाकिटबंद दूध विक्रीसाठी जाते. मात्र, यंदा विदर्भात पावसाने दडी दिल्याने याचा परिणाम दुग्ध उत्पादनावरही झाले असून दोन महिन्यांत दुधाची आवक वाढली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत या महिन्यात दीड ते दोन हजार लीटरने दुधाची आवक घटल्याचे दिसून येत आहे. ३.५ व ८.५ (एसएनएफ) सॉलिड नॉट फॅट साठी २९.५० रूपये लीटर मागे शासकीय भाव मिळत आहे. पण खासगी दुधाच्या तुलनेत हा भाव फारच कमी आहे. त्यामुळे अनेक दुग्ध उत्पादन संस्था बंद पडल्या आहेत. खासगी दुग्धविकास संस्था या खासगी डेअºयांना दुधाची विक्री करतात. तेथे त्यांना लीटरमागे ३५ ते ४० रूपये भाव मिळत आहे.
मागील दोन महिन्यात दीड ते दोन हजार लिटरने दुधाची आवक वाढली असली तरी यावर्षी पाऊस कमी असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत दोन हजार लीटरने दुधाची आवक घटली आहे.
- एस.बी.जांभुळे, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, अमरावती