अमरावती शालेय विद्यार्थ्यांना वृत्तपत्राचे मुद्रण पाहण्याची मिळाली संधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 09:50 PM2018-01-13T21:50:56+5:302018-01-13T21:51:24+5:30

तिवसाघाट येथील गंगूबाई नामदेवराव शेरेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’च्या बुटीबोरी येथील मुद्रण विभागाला भेट दिली.

Amravati school students got the opportunity to see the print of the newspaper | अमरावती शालेय विद्यार्थ्यांना वृत्तपत्राचे मुद्रण पाहण्याची मिळाली संधी 

अमरावती शालेय विद्यार्थ्यांना वृत्तपत्राचे मुद्रण पाहण्याची मिळाली संधी 

Next

वरूड(अमरावती) :  तिवसाघाट येथील गंगूबाई नामदेवराव शेरेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’च्या बुटीबोरी येथील मुद्रण विभागाला भेट दिली. वृत्तपत्रांची छपाई कशी केली जाते, याची इत्थंभूत माहिती जाणून घेतली.  ४२ विद्यार्थी व ९ शिक्षकांची एक चमू 10 जानेवारी रोजी बुटीबोरी येथील छपाई सयंत्राच्या भेटीला गेले होते. ‘मुद्रण विभागाला भेट’ हा उपक्रम 'लोकमत'चे मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या विशेष कार्यक्रमात सामील असल्याने या भेटीला विशेष महत्त्व असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांसोबत असलेल्या शिक्षकांनी सांगितले. 

यावेळी वृत्तपत्रांचे कामकाज कसे चालते, याची माहितीही यावेळी विद्यार्थ्यांना पीपीटीच्या माध्यमातून देण्यात आली. संपादकीय, जाहिरात विभागाकडून प्राप्त झालेल्या मजकुरानंतर पेजिनेशन विभाग त्यावर कसे संस्कार करतो व पाने छपाईसाठी कशी तयार होतात, यासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. छपाईची माहिती विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने मिळावी, यासाठी मशीनवर सुरू असलेल्या कामांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आलेत. विद्यार्थी यावेळी ‘लोकमत आॅक्सिजन’ या युवकांसाठी असलेल्या विशेष पुरवणीच्या छपाईचे साक्षीदार ठरलेत. त्यांनी ‘लोकमत’च्या हरितऊर्जा प्रकल्पाची (सौरऊर्जा) पाहणी केली. सौरऊर्जेमुळे पाणी, कोळसा व अन्य माध्यमांची बचत करता येते, ही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यानंतर लोकमतच्या व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन समाधान केले. ही भेट अविस्मरणीय ठरली, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

Web Title: Amravati school students got the opportunity to see the print of the newspaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.