अमरावतीच्या पोलिसाने मिळविले राष्ट्रीय सुवर्णपदक
By Admin | Updated: April 30, 2015 00:14 IST2015-04-30T00:14:12+5:302015-04-30T00:14:12+5:30
राष्ट्रीय स्तरावरील मास्टर अॅथेलॅटिक चॅम्पियनशिप २०१५ मधील अडथळा स्पर्धेमध्ये अमरावतीच्या पोलीस शिपायाने सुवर्णपदक पटकाविले.

अमरावतीच्या पोलिसाने मिळविले राष्ट्रीय सुवर्णपदक
अडथळा शर्यतीत प्रथम : आशियाई स्पर्धेकरिता जाणार फ्रान्सला
अमरावती : राष्ट्रीय स्तरावरील मास्टर अॅथेलॅटिक चॅम्पियनशिप २०१५ मधील अडथळा स्पर्धेमध्ये अमरावतीच्या पोलीस शिपायाने सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे फ्रान्समध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे.
पोलीस मुख्यालयात कार्यरत संजय वानखडे (ब.क्र.९१) यांनी १६ ते १९ एप्रिलदरम्यान हिमाचल प्रदेशात झालेल्या अॅथलेटिक स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामध्ये संजय यांनी ११० मीटरच्या अडथळा स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळविले. संजय वानखडे यांनी यापूर्वीसुध्दा मलेशिया, सिंगापूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. मंगळवारी संजय यांनी प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. त्यांनीही कौतुकाची थाप देत वानखडेंचा गौरव केला. (प्रतिनिधी)