शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती : जरूड येथे क्रिकेट सट्ट्यावर धाडीत पिस्तूल, तीन जिवंत काडतूस जप्त, दोघांना अटक- मनसे पदाधिकारी पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 18:52 IST

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जरूड येथे क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकण्यास गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथून देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतूस जप्त केले.

वरूड (अमरावती): पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जरूड येथे क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकण्यास गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथून देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतूस जप्त केले. मनसेचे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष संजय देशमुख याच्या घरी हा सट्टा सुरू होता. येथून दोघांना अटक करण्यात आली, तर संजय देशमुख पसार झाला आहे. 

भारत व श्रीलंका यांच्यात २२ डिसेंबरला टी-२० क्रिकेट सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान जरूड येथील होळी चौकात मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय देशमुख याच्या घरी क्रिकेट सट्टा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर व सहायक पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज काकडे, पोलीस उपनिरीक्षक अशोकसिंह चव्हाण, हेडकॉन्स्टेबल वासुदेव नागलकर, जगदीश ठाकरे, नायक पोलीस कॉन्स्टेबल सुनील मलातपुरे, गजेंद्र ऊर्फ बाबा ठाकरे, कॉन्स्टेबल प्रवीण अंबाडकर, दिनेश कनोजिया, चालक नितेश तेलगोटे यांनी ४.३० वाजता धाडसत्र राबविले. 

पहिल्या धाडीत साडेचार वाजता संजय देशमुख याच्या घरून अमोल पुंडलिकराव यावले (२२, रा. विठ्ठल चौक), विशाल अशोक भुजाडे (२२, रा. इंदिरानगर) यांना पोलिसांनी अटक केली. तीन मोबाइल, सोनी कंपनीचा एलईडी टीव्ही, रोख ६०८० रुपये जप्त करण्यात आले. झडतीदरम्यान संजय देशमुख याच्या घरी देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व तीन जिवंत काडतूस असा ८३ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी संजय देशमुख व नागपूर येथील अण्णा नामक युवक पसार होण्यात यशस्वी ठरले. चारही आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम ४ व  ५ तसेच सहकलम ३, २५ आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून दोघांना वरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंगाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, पोलीस उपनिरीक्षक पंकज काकडे, अशोकसिंह चव्हाण, वासुदेव नागलकर, जगदीश ठाकरे, सुनील मलातपुरे, गजेंद्र ठाकरे, प्रवीण अंबाडकर, दिनशे कनोजिया,नितेश तेलगोटे, विनोद बाभूळकर करीत आहेत. 

दुस-या धाडीत २० हजारांचा मुद्देमाल जप्तजरुड येथेच सायंकाळी ५ वाजता गजानन सुखदेव ब्राह्मणे याच्या घरून एल.ई.डी. स्क्रीनसह मोबाइल, रोख रक्कम  असा १९ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. येथून राजेंद्र सुखदेव ब्राम्हणे (३२, रा. इंदिरानगर) याला अटक करण्यात आली, तर गजानन व मोर्शी येथील एक अज्ञात आरोपी फरार आहे. तीन मोबाइल, सोनी कंपनीचा एलईडी, २ हजार ३०० रुपये रोख असा एकूण १९ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :Crimeगुन्हा