अमरावतीत पायरेटेड सीडीजचा व्यापार बहरला !

By Admin | Updated: January 7, 2017 00:14 IST2017-01-07T00:14:55+5:302017-01-07T00:14:55+5:30

नवीन कुठलाही चित्रपट आला तर चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सहज पायरेटेड सीडीज व डिव्हीडी ग्राहकांना अंबानगरीत सहज उपलब्ध होते.

Amravati Pirated CDs business started! | अमरावतीत पायरेटेड सीडीजचा व्यापार बहरला !

अमरावतीत पायरेटेड सीडीजचा व्यापार बहरला !

नियंत्रण नसे कुणाचे : पोलीस कारवाई केव्हा ?
संदीप मानकर अमरावती
नवीन कुठलाही चित्रपट आला तर चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सहज पायरेटेड सीडीज व डिव्हीडी ग्राहकांना अंबानगरीत सहज उपलब्ध होते. हा प्रकार नियमबाह्य आहे. या सीडीज कशा काय विक्री करण्यात येतात, हा प्रश्न अंबानगरीतील नागरिकांना पडला आहे. अमरावतीत पायरेटेड सीडीजचा व्यापार मोठ्या प्रमाणात बहरला आहे. अल्पदरात या ठिकाणी पायरेटेड सीडीजची सर्रास विक्री करण्यात येत आहे.
पायरेसी सीडीज तयार करून त्या ग्राहकांना विकणे हा कॉपी राईट अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा ठरतो. पायरेटेड सिडीज तयार करून विक्रीचे व या व्यवसायाचे राज्यभर मोठे जाळे पसरले आहे. यातून महिन्याकाटी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करण्यात येत आहे. अंबानगरीतही हे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. अमरावती व बडनेऱ्यात याचे ८ ते १० पायराटेड सीडीजच्या विक्रीची दुकाने आहेत.
एखादा चित्रपट रिलीज झाला की, त्या चित्रपटाचे गाणे व त्या चित्रपटाचा हक्क इतर अनेक नामांकित कंपनी विकत घेते. मात्र अधिकृत कंपनीची गाण्याची किंवा चित्रपटाच्या ओरीजनल सीडीज उशिरा मार्केटमध्ये येतात. या व्यवसायात असणारे कुठलाही चित्रपट ज्या दिवशी रॅलीज होतो. त्या चित्रपटाची सीडीज व डिव्हीडी लगेच दुसऱ्या दिवशी पायरेटेड होऊन विक्री कशी होते? चित्रपटाची ओरीजनल सीडीज महाग मिळते.
नामांकित कंपनीची ओरीजनल सीडीज २०० ते ५०० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येते. पण हीच पायरेटेट केलेली सीडीज व डीव्हीडी मार्केटमध्ये फक्त २० ते ८० रुपयांपर्यंत विक्रीस येते. अंबानगरीत ह्या सीडीज विकत घेणाऱ्यांचा वर्ग मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानात मोठी गर्दी असते. एका दुकानदाऱ्याचा महिन्याकाठी दीड ते दोन लाख रुपयांच्या पायरेटेड सीडीज, डीव्हीडी विक्री करण्यात येत आहेत. याच जिल्ह्यातील विक्री महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांच्या घरात जात आहे. जतस्तंभ चौक, जुने कॉर्टन मार्केट, ईतवारा, बडनेरा या भागात पायरेटेड सीडीजची सर्रास विक्री करण्यात येत आहे. ज्या अधिकृत कंपनीच्या कंपनीनेने प्रदर्शित होणारे चित्रपटांच्या ओडीओ व व्हिडीओ, व चित्रपटांच्या सीडीज ज्या पायरेटेट पद्धतीने मार्केटमध्ये कमी पैशात विक्री करण्यात येत आहे. त्या दुकानदारांवर कारवाई व्हायलाच हवी. अधिकृत कंपनीने नेमलेल्या स्थानिक एजंटने अशा पायरेटेड सीडी जची विक्री करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली असल्यास अशा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.

अश्लील फिल्मस्च्या सीडीजही वापरात
अंबानगरीत महाविद्यालयीन तरुणांमध्ये अश्लील चित्र पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. काही तरुण तर सत्त इंनटनेटचा वापर करून अशा फिल्मस डाऊनलोड करतात. पण आता पेनेड्रायईव्ह व मोबाईलमध्ये काही सीडीज विक्रीच्या सेंटरमध्ये काही पैेसे देऊन ह्या अश्लील फिल्म डाऊनलोड करून देण्यात येतात. हा व्यापारही अधिक पसरला आहे. यातून तरुणवर्ग बिघडत चालले आहे. अश्लील चित्रुटाच्या सीडीज विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. त्यांनी अशा केंद्रांवर धाडी टाकून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

डाऊनलोड करून विक्री
तरुणांमध्ये सध्या मोबाईल किंवा सीडीजमध्ये डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढले आहे. कुठल्याही चित्रपटांची निर्मिती झाल्यानंतर मोबाईलमध्ये असलेल्या काही म्हत्त्वाच्या अ‍ॅपस्मधून कुठलाही चित्रपट इंटरनेटची सेवा वापरून डाऊनलोड करू शकतो. त्यामुळे ट्रांरन्टअ‍ॅपसवरूनही मोठ्या प्रमाणात चित्रपट डाऊलोड करून त्याच्या पायरेटेड सिडीज तयार करण्याचा गौरखधंदा वाढला आहे. याचा व्यापार मोठा असून फक्त २० ते ४० रुपयांमध्ये कुठल्याही नवीन चित्रपटांची पायरेटेड सीडीज सहज उपलब्ध होत आहे. ज्या अधिकृत कंपनीकडे याचे हक्क व अधिकार दिला आहे. त्यांचे स्थानिक एजंट अंबानगरीत आहेत. त्या कंपनीच्या सीडीज पायरेटेड केल्या जात असतील तर त्यांनी असा अवैध व्यापार करणाऱ्यांच्या तक्रारी संबंधित विभागाकडे करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सीडीज पायरेटेड होत असेल तर अधिकृत कंपनीचे नेमलेल्या प्रतिनिधींनी आमच्याकडे तक्रार करावी व अश्लिल चित्रपटाचा व्यापार होत असेल तर माहिती घेऊन धाडी टाकू.
- मिलींद पाटील, एसीपी,
राजापेठ, अमरावती

Web Title: Amravati Pirated CDs business started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.