शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रविवारपासून अमरावती-मुंबई विमानाच्या वेळेत बदल; आता आठवड्यातून चार दिवस फेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 19:55 IST

Amravati : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ ठरले, विमानतळाने ३८९ हेक्टर क्षेत्र व्यापले. १८५० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदीची धावपट्टी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील विमानतळावरून अलायन्स एअर लाईनच्या अमरावती ते मुंबई विमान सेवेच्या वेळेत बदल होणार असून रविवार, २६ ऑक्टोबरपासून सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी विमान मुंबईकडे झेपावणार आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे चार दिवस आठवड्यातून मुंबईसाठी विमान सेवा असणार आहे. त्याअनुषंगाने अलायन्स एअर लाईनच्या संकेतस्थळावर वेळेत बदल करण्यात आले आहे. मात्र रविवारी मुंबईकडे जाण्यासाठी तिकीट उपलब्ध नसून आरक्षण हाऊसफुल्ल आहे. तर मुंबईहून अमरावतीत येण्यासाठी केवळ दोन तिकीट संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजून ५३ मिनिटांनी दिसून आले. 

नाईट लैंडिंग सुविधा उभारण्याचे काम सुरू

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ ठरले, विमानतळाने ३८९ हेक्टर क्षेत्र व्यापले. १८५० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदीची धावपट्टी आहे. सध्या नाईट लैंडिंग सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. अमरावती विमानतळाहून हल्ली अलायन्स एअरची एटीआर ७२ मुंबई विमानसेवा सुरू आहे. 

असे असेल नवे वेळापत्रक

मुंबई ते अमरावती सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी टेकऑफ होईल. अमरावती विमानतळावर सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी लैंडिंग होईल. अमरावती ते मुंबई सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी टेकऑफ होईल. मुंबई विमानतळावर सकाळी ११ वाजता लैंडिंग होईल. वेळापत्रक बदलानंतर पहिल्याच दिवशी मुंबईकडे प्रवासाचे तिकीट हाऊसफुल्ल आहे.

"अमरावती-मुंबई विमानसेवेच्या वेळेत २६ ऑक्टोबरपासून बदल होत आहे. आठवड्यातून चार दिवस विमानसेवा असेल. अलायन्स एअरने संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर केले आहे. नवीन वेळेनुसार विमानांचे टेकऑफ, लैंडिंग होईल."- राजकुमार पटेल, प्रबंधक, अमरावती विमानतळ.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati-Mumbai Flight Timings Change From Sunday; Four Days a Week

Web Summary : Amravati-Mumbai flight timings change from October 26th. Flights will operate four days a week: Monday, Wednesday, Friday, and Sunday. The first Sunday is already fully booked. Night landing facility construction is underway at Amravati Airport.
टॅग्स :Amravatiअमरावतीairplaneविमान