अमरावतीच्या खासदारांची ‘टी-डिप्लोमसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:13 IST2021-07-25T04:13:02+5:302021-07-25T04:13:02+5:30

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची टी-डिप्लोमसी लोकप्रिय होत चालल्याने त्या याचा परिणामकारक वापर सामान्यांमध्ये मिसळण्यासाठी करीत आहेत. त्याचा प्रत्यय ...

Amravati MPs' 'T-diplomacy' | अमरावतीच्या खासदारांची ‘टी-डिप्लोमसी’

अमरावतीच्या खासदारांची ‘टी-डिप्लोमसी’

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची टी-डिप्लोमसी लोकप्रिय होत चालल्याने त्या याचा परिणामकारक वापर सामान्यांमध्ये मिसळण्यासाठी करीत आहेत. त्याचा प्रत्यय शनिवारी त्यांच्या पूरस्थितीच्या पाहणी दौऱ्यातही आला. त्याचे झाले असे की, खासदार नवनीत राणा या शनिवारी भातकुली तालुक्यात पुराच्या पाण्याने उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी यावेळी मार्गातील एक चहा टपरी गाठली आणि अगदी आपुलकीच्या सुरात तेथील लोकांशी संवाद साधला. प्रत्यक्ष खासदार आपल्याशी संवाद साधत असल्याची सुखद अनुभूती त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती. एरवी चहा न घेणाऱ्या खासदारांनी सोबतच्या मंडळींना गावखेड्यातील चहासाठी आग्रह करताना स्वत:देखील त्याचा आस्वाद घेतला.

- गणेश वासनिक, अमरावती

Web Title: Amravati MPs' 'T-diplomacy'