अमरावतीचे महापौरपद ‘एससी’कडे
By Admin | Updated: February 4, 2017 00:06 IST2017-02-04T00:06:56+5:302017-02-04T00:06:56+5:30
नगरविकास विभागाने शुक्रवारी राज्यातील महापालिकांमधील महापौरपदाची सोडत जाहीर केली आहे.

अमरावतीचे महापौरपद ‘एससी’कडे
अमरावती : नगरविकास विभागाने शुक्रवारी राज्यातील महापालिकांमधील महापौरपदाची सोडत जाहीर केली आहे. यात अमरावती महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले आहे.
शुक्रवारी मुंबईत २७ महापालिकांमधील महापौरपदासाठी सोडत काढण्यात आली. २७ पैकी १४ महापालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. यात अमरावती महापौरपद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित असेल. याशिवाय पनवेल आणि नांदेड, वाघाळा महापालिकेचे महापौरपद एससी महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे महापालिका निवडणुकीची नामांकन प्रक्रियेच्या अगदी शेवटच्या दिवशी महापौरपदाची सोडत काढण्यात आली. ८७ सदस्यीय सभागृहात अनुसूचित जातीसाठी १५ जागा राखीव आहेत. २१ फेब्रुवारीला महापालिकेची निवडणूक होत आहे.