शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती लोकसभा निवडणूक निकाल 2019 : अमरावतीचा गड शिवसेना राखणार की नवनीत राणा बाजी मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 12:49 IST

अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  मात्र मुख्य लढत ही महाआघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा व महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये आहे.

ठळक मुद्देअमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुख्य लढत ही महाआघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा व महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये आहे. अमरावतीमध्ये महायुतीचे उमेदवार (शिवसेना) आनंदराव अडसूळ यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 1,79,074 मतं मिळाली आहेत.

अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  मात्र मुख्य लढत ही महाआघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा व महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून अमरावती लोकसभा मतदारसंघावर 1991 पर्यंत भारताच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील निवडून येईपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2009 नंतर शिवसेनेचे आनंदराव अडसूळ दोन वेळा निवडून आले. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेची पकड पाहायला मिळाली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अमरावतीमध्ये महायुतीचे उमेदवार (शिवसेना) आनंदराव अडसूळ यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 1,79,074 मतं मिळाली आहेत. तर महाआघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा या पिछाडीवर असून त्यांच्या पारड्यात 1,68,141 मतं पडली आहेत. महायुतीचे अडसूळ 11,933 मतांनी आघाडीवर आहेत. 

2014 लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि आघाडीच्या नवनीत कौर राणा यांचा सामना रंगणार आहे. गेल्या वर्षी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार असणाऱ्या नवनीत कौर राणा यांना युवा स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा होता. लोकसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत भाजपाशी जवळीक साधणारे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. अमरावती मतदारसंघातील एकूण 18 लाख 30 हजार 561 मतदारांपैकी 11 लाख चार हजार 936 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अमरावती मतदारसंघाची टक्केवारी 60.36 राहिली आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालamravati-pcअमरावतीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा