शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

मुंबईतील परप्रांतीय टॅक्सी चालकाविरुद्ध अमरावतीत गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 8:34 PM

तरुणीचा विवाह निश्चित झाल्याचे विजयला समजल्यानंतर त्याने तिच्या वडिलांना फोनवर धमक्या देणे सुरू केले.

अमरावती : लग्न जुळलेल्या तरुणीच्या फोटोशी छेडछाड करून आणि विवाहाचे बनावट दस्तावेज तयार करून वरपक्षाला पाठविणाºया मुंबईच्या परप्रांतीय टॅक्सीचालकाविरुद्ध अमरावती येथील तरुणीने  फ्रेजरपुरा पोलिसांत सोमवारी तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी विजय ऊर्फ ब्रिजलाल यादव (रा. कल्याण वेस्ट, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी २६ वर्षीय तरुणी मुंबई येथील एका कंपनीत वर्षभरापासून नोकरी करीत आहे. ती कल्याण येथे वास्तव्यास आहे. मे २०१९ मध्ये त्या तरुणीचा विवाह कांदीवली येथील एका तरुणाशी कुटुंबीयांनी जुळविला. मात्र, विजय नामक मुंबईतील टॅक्सीचालक त्या तरुणीच्या मागे लागला. तिने विजयची माहिती काढली असता, तो उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली. त्याला ती ओळखत नव्हती; मात्र तो दूरचा नातेवाईक असल्याचे समजले.

तरुणीचा विवाह निश्चित झाल्याचे विजयला समजल्यानंतर त्याने तिच्या वडिलांना फोनवर धमक्या देणे सुरू केले. तुमच्या मुलीशी माझे लग्न झाले आहे; तिचे लग्न दुसरीकडे करू शकत नाही. तिचे लग्न केल्यास मी तुम्हाला जीवे मारून टाकीन, अशा धमक्या विजय तरुणीच्या वडिलांना फोनवर देऊ लागला. याशिवाय तरुणीचा पाठलाग करून मी तुला कुणाची होऊ देणार नाही, तुझे लग्न होऊ देणार नाही, अशा धमक्या देऊन तिला शरीरसुखाची मागणी करू लागला. २७ आॅक्टोबर रोजी तरुणी कांदीवली येथून घरी पायी जात असताना, विजय तेथे आला आणि शरीरसुखाची मागणी केली. तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने तिला थापडांनी मारहाण केली, तिने आरडाओरड केल्यानंतर विजय तेथून पळून गेला.

या घटनेची तक्रार पीडित तरुणीने मुंबईच्या कल्याण (पश्चिम) स्थित महात्मा फुले पोलीस ठाण्यात नोंदविली. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे पीडित मुलीने फ्रेजरपुरा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सततच्या पाठलागाने त्रस्त झालेली तरुणी अखेर १६ नोव्हेंबर रोजी अमरावतीला येण्यासाठी निघाली. यादरम्यान विजयने पुन्हा वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून तरुणीला व तिच्या वडिलांना कॉल केले. विजयच्या अशा त्रासामुळे अबु्रला व जीवितास धोका असल्यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार पीडित मुलीने सोमवारी फ्रेजरपुरा पोलिसात नोंदविली आहे. 

गैरअर्जदार विजय वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल करतो. त्याने फोटो मिक्सिंंग करून मुंबईतील वकिलामार्फत विवाहाची बनावट नोटरी केली आणि हे दस्तावेज नियोजित पती व माझ्या घरी पाठविल्याचे पीडित मुलीने तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र ढोके करीत आहेत. - मुलीची तक्रार प्राप्त झाली असून, तक्रारीच्या अनुषंगाने मुंबईच्या संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुंडलिक मेश्राम, पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

टॅग्स :Amravatiअमरावती