अमरावतीच्या औद्योगिक वसाहती असुरक्षित
By Admin | Updated: November 1, 2014 22:44 IST2014-11-01T22:44:01+5:302014-11-01T22:44:01+5:30
जिल्ह्यात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. यामध्ये अनेक कारखान्यांचा समावेश असून या वसाहतींमध्ये असुविधांचा खच असल्याने उद्योजकांसह कामगारांचे आरोग्य असुरक्षित बनले आहे.

अमरावतीच्या औद्योगिक वसाहती असुरक्षित
इंदल चव्हाण - अमरावती
जिल्ह्यात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. यामध्ये अनेक कारखान्यांचा समावेश असून या वसाहतींमध्ये असुविधांचा खच असल्याने उद्योजकांसह कामगारांचे आरोग्य असुरक्षित बनले आहे.
अमरावती येथील एमआयडीसीला संरक्षण भिंत नसल्याने मोकाट जनावरांचा मुक्त संचार असतो. १९७८ पासून स्थापन झालेल्या या एमआयडीसी भागात कामगारांकरिता सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगार आडोशा घेऊन विधी उरकत असल्यामुळे घाण पसरली आहे. त्यावर परिसरात मुक्त संचार करणारे वराह अस्वच्छतेला बळ देतात. तसेच येथे पिण्यायोग्य पाणी नसल्याने उद्योजकांसह कामगारांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या समस्यांकडे एमआयडीसी अभियांत्रिकी विभाग वा महापालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. मात्र रस्त्यावरील खड्डे व सार्वजनिक स्वच्छतेबाबत अत्यंत उदासीन आहेत. अमरावती एमआयडी क्षेत्रात किमान १० ते १५ हजार कामगार काम करतात. या एमआयडीसीमध्ये कायमस्वरुपी अधीक्षक अभियंता नेमणे गरजेचे आहे. मात्र अद्यापपर्यंत येथे अधीक्षक अभियंत्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यांच्याऐवजी कार्यकारी अभियंता नेमण्यात आले आहे. परंतु ते त्यादृष्टीने सक्षम नाहीत.