अमरावतीकरांना हेलिकॉप्टर ‘जॉय रायडिंग’ची पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 00:21 IST2016-02-11T00:21:05+5:302016-02-11T00:21:05+5:30

विमान किंवा हेलिकॉप्टरचा प्रवास हे सामान्यांचे स्वप्न असते. अचलपूर येथील मूळ निवासी असलेले विलास कथे हे ...

Amravati, the helicopter 'Joy Riding' | अमरावतीकरांना हेलिकॉप्टर ‘जॉय रायडिंग’ची पर्वणी

अमरावतीकरांना हेलिकॉप्टर ‘जॉय रायडिंग’ची पर्वणी

अमरावती : विमान किंवा हेलिकॉप्टरचा प्रवास हे सामान्यांचे स्वप्न असते. अचलपूर येथील मूळ निवासी असलेले विलास कथे हे एप्रिल महिन्यात अमरावतीकरांना ‘हेलिकॉप्टरचे जॉय रायडिंग’ची संधी उपलब्ध करून देणार आहेत. महापौर चरणजित कौर नंदा यांच्या पुढाकाराने अमरावतीकर हेलिकॉप्टर सफरीच्या या विनाव्यावसायिक योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
अचलपुरातून २५ वर्षांपूर्वी मुंबईत दाखल झाल्यानंतर सिनेजगतात अस्तित्व तयार करणारे, हेलिकॉप्टर-चार्टर्ड प्लेनची कंपनी चालविणारे विलास कथे यांचा महापौर चरणजितकौर नंदा यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला. कथे यांनी दिग्दर्शक सुभाष घई, प्रभुदेवा यांना चित्रपट निर्मितीत सहाय्य केले. सौदागर, खलनायक या चित्रपटांत नियंत्रकाचे कामदेखील त्यांनी केले. सौदागर या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी वापरण्यात आलेले हेलिकॉप्टर आपणच पुरविल्याचे कथे यांनी सांगितले. विदर्भाच्या मातीत वाढल्याने या मातीचे ऋण फेडण्याची अपार इच्ठा आहे. सामान्यांना अवघ्या आयुष्यात हेलिकॉप्टरमध्ये बसणे शक्य होत नाही. अमरावतीकरांना हेलिकॉप्टर सफरची संधी मिळावी, यासाठी 'जॉय रायडींग' प्रकल्प राबविण्याची मनीषा कथे यांनी महापौरांसमक्ष व्यक्त केली. कुठल्याही व्यावसायिक लाभाविना आपण ही संधी अमरावतीकरांना उपलब्ध करुन देऊ, अशी तयारी कथे यांनी दर्शविली.
उड्डाणासाठी परवानगी मिळाल्यावरच निर्णय
अमरावती : एप्रिल महिन्यात तीन दिवस अमरावतीकरांना हेलिकॉप्टरने ‘जॉय रायडिंग’ची संधी उपलब्ध करुन देता येईल की कसे याबाबत चाचपणी सुरु आहे.
हेलिकॉप्टरने हवाई सफर करण्यासाठी विविध परवानग्या मिळवाव्या लागतात. सर्व प्रकारच्या परवानगी मिळाल्या तरच पुढे पाऊल टाकू, असे कथे म्हणाले.

Web Title: Amravati, the helicopter 'Joy Riding'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.