अमरावती :अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून काँग्रेसला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून काँग्रेसचे उमेदवार संजय शिरभाते यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या प्रभागातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अमरावती महापालिकेतील जवाहर गेट बुधवारा या प्रभागात मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा पराभव झाला आहे काँग्रेसचे डॉ. संजय शिरभाते यांनी त्यांचा पराभव केला असून त्या प्रभागातून काँग्रेसच्या चारही जागा निवडून आल्या आहेत. बुधवारा प्रभागातून काँग्रेसचे विलास इंगोले सलग सातव्यांदा विजयी झाले आहेत.
तर दुसरीकडे साईनगर अकोली या प्रभागातील हाय व्होल्टेज जळतील भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांचा युवा स्वाभिमांचे उमेदवार सचिन भेंडे यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. सचिन भेंडे हे जायंट किलर ठरले आहेत. रवी राणा यांचे कट्टर समर्थक असलेले सचिन भेंडे यांनी तुषार भारतीय यांना चांगलीच लढत दिली. आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांनी देखील भेंडे यांच्या विजयासाठी दिवस-रात्र एक केला होता त्याची परिणीती म्हणून सचिन भेंडे हे पहिल्यांदाच युवा स्वाभिमानाच्या उमेदवारीवर अमरावती महापालिकेच्या सभागृहात पोहोचले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक पराभूत झाल्याने भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. या निकालामुळे अमरावतीतील स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे. या विजयामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असून आगामी निवडणुकांसाठी हा निकाल महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.
Web Summary : In Amravati's municipal election, Congress' Sanjay Shirbhate defeated Vivek Kaloti, relative of Devendra Fadnavis. This major victory for Congress is seen as a setback for BJP, potentially reshaping local politics and boosting Congress' confidence for future elections.
Web Summary : अमरावती महानगरपालिका चुनाव में कांग्रेस के संजय शिरभाटे ने देवेंद्र फडणवीस के रिश्तेदार विवेक कलोती को हराया। कांग्रेस की यह बड़ी जीत भाजपा के लिए एक झटका है, जिससे स्थानीय राजनीति में बदलाव की संभावना है और आगामी चुनावों के लिए कांग्रेस का आत्मविश्वास बढ़ा है।