महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेत अमरावतीचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:37 IST2018-12-26T22:37:01+5:302018-12-26T22:37:14+5:30

खान्देशी अहिराणी कस्तुरी मंचद्वारे आयोजित मराठमोळ्या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेमध्ये अमरावतीच्या सौंदर्याचा बोलबाला ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी गटात शीतल मनोज चौधरी उपविजेताच्या मुकुटाच्या मानकरी ठरल्या, तर विदर्भ सौंदर्यसम्राज्ञी म्हणून करूणा कदम या विजयी ठरल्या आहेत.

Amravati dominates Maharashtra beauty pageant | महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेत अमरावतीचा बोलबाला

महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेत अमरावतीचा बोलबाला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खान्देशी अहिराणी कस्तुरी मंचद्वारे आयोजित मराठमोळ्या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेमध्ये अमरावतीच्या सौंदर्याचा बोलबाला ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी गटात शीतल मनोज चौधरी उपविजेताच्या मुकुटाच्या मानकरी ठरल्या, तर विदर्भ सौंदर्यसम्राज्ञी म्हणून करूणा कदम या विजयी ठरल्या आहेत.
प्रा. रामकृष्ण प्रेक्षकगृह पिंपरी चिंचवड पूणे येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. यात सौभाग्यवती गटात एकूण सहा फेरीमध्ये अमरावतीच्या शितल चौधरी यांनी आघाडी घेतली होती. त्यात त्या महाराष्ट्राच्या उपविजेत्या ठरल्या तर करूणा कदम यांनी विदर्भ सम्राज्ञी हा पुरस्कार जिंकला. त्यांना ‘विदर्भाची आई’ हा सन्मान मिळाला. विजयी महिला लोकमत सखी मंचच्या सदस्य आहेत.

Web Title: Amravati dominates Maharashtra beauty pageant