अमरावती विभागातील दुग्धव्यवसाय अडचणीत!
By Admin | Updated: August 4, 2016 00:48 IST2016-08-04T00:48:53+5:302016-08-04T00:48:53+5:30
१६८५ दुग्ध सहकारी संस्था बंद; शेतकरी आर्थिक विवंचनेत.

अमरावती विभागातील दुग्धव्यवसाय अडचणीत!
चंद्रपूर : जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक व चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यशाळा रेंजर कॉलेज चंद्रपूर येथे सोमवारी पार पडली. या कार्यशाळेला मुख्याध्यापक व एक उपक्रमशिल शिक्षक यांची उपस्थिती होती.
शासन नव्यानेच माध्यमिक शाळासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची सुरूवात करणार असल्याने याची सुरूवात चंद्रपुरातून व्हावी अशी अपेक्षा माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांची होती. त्यानुसार त्यांच्याच पुढाकारातुन आणि चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सहकार्याने कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेला डायटचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, प्रमुख वक्ते म्हणून शिक्षण तज्ञ प्रा. रमेश पानशे, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मंदा उमाटे, अंजुषा बोधनकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीधर फटाले, सचिव राजु साखरकर, कोषाध्यक्ष नरेंद्र बोबडे व इतर पदाधिकारी उपस्थितीत होते.
प्रा. रमेश पानसे यांनी कार्यशाळेत प्रोजेक्टर लॉपटापच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणातील रचनावाद समजून घेण्यासाठी शिक्षक जसे कुमठे बिटला जातात, अगदी त्याप्रमाणे माध्यमिकचा ज्ञानरचनावाद समजून घेण्यासाठी राज्यातील शिक्षक चंद्रपूरला यायला, हवे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यशाळेला मुख्याध्यापक व प्रत्येक शाळेतून एक उपक्रमशील एक हजार शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते. संचालन ठाकरे यांनी तर आभार बोबडे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)