Amravati Division Teachers Constituency Election; Counting begins | अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; मतमोजणी प्रारंभ 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; मतमोजणी प्रारंभ 

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली.
विलासनगर येथील शासकीय गोदामात असलेल्या मजमोजणी स्थळी सकाळी सहा वाजता सर्व अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. सर्वांना पुन्हा त्यांची जबाबदारी समजावून देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा कक्षाचे सील तोडून मतपेट्या मतमोजणी कक्षात हलविण्यात आल्या.
निवडणूक निरीक्षक आनंद लिमये, निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित आहेत.
पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणे, सरमिसळ आदी कामे होत आहेत. 
शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण ३० हजार ८६९ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ८६.७३ आहे.
मतमोजणी दोन कक्षात 14 टेबलवर  होत आहे. 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येतील. यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर करण्यात येत आहेत. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण होईल. एकूण वैध मतांप्रमाणे ठरविण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्यास आवश्यकतेनुसार दुसऱ्या, तिसऱ्या अशी क्रमश: पसंतीची मते मोजण्यात येतील.

Web Title: Amravati Division Teachers Constituency Election; Counting begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.