उद्योगांमध्ये माघारला अमरावती जिल्हा
By Admin | Updated: December 9, 2014 22:41 IST2014-12-09T22:41:59+5:302014-12-09T22:41:59+5:30
जिल्ह्यात उद्योगांसाठी उपयुक्त वातावरण असतानाही उद्योग निर्मितीला यश मिळाले नाही. त्यामुळे उद्योगात जिल्हाची पिछेहाट झाली आहे, अशी स्पष्टोक्ती मंगळवारी दुपारी विभागीय आयुक्त

उद्योगांमध्ये माघारला अमरावती जिल्हा
अमरावती : जिल्ह्यात उद्योगांसाठी उपयुक्त वातावरण असतानाही उद्योग निर्मितीला यश मिळाले नाही. त्यामुळे उद्योगात जिल्हाची पिछेहाट झाली आहे, अशी स्पष्टोक्ती मंगळवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात उद्योजकांशी चर्चा करताना उद्योग मंत्रालय प्रधान सचिव अपूर्व चंद्र यांनी दिली.
चर्चेदरम्यान चंद्र यांनी जिल्हातील उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वस्त्रोद्योग अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, उद्योग प्रधान सचिव अपूर्व चंद्र, जिल्हाधिकारी किरण कुमार गित्ते, मनपा आयुक्त अरुण डोंगरे, एमआयडीसीचे गोविंद बोडखे, मुख्य अभियंता वाघ, उद्योग सहायक आयुक्त विकास जैन उपस्थित होते. भविष्यात कापूस, सोयाबीन तसेच संत्र्याशी संबंधित उद्योगांचा विकास होण्याची शक्यता चंद्र यांनी वर्तविली.