अमरावती : चांदूर बाजारमध्ये आ. बच्चू कडू गटाला एकहाती सत्ता
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 30, 2023 22:03 IST2023-04-30T22:02:46+5:302023-04-30T22:03:10+5:30
सहा बाजार समित्यांचे निकाल, धामणगाव, वरुडमध्ये आमदार गटाला फटका

अमरावती : चांदूर बाजारमध्ये आ. बच्चू कडू गटाला एकहाती सत्ता
जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांचे निकाल रविवारी उशिरा जाहीर झाले. यामध्ये बच्चू कडू यांनी चांदूरबाजार राखले तर अचलपूर गमाविले. अचलपूरला जिल्हा कॉग्रसचे अध्यक्ष बबलू देशमुख गटाने एकहाती विजय मिळविला.
वरुडमध्ये खा. अनिल बोंडे, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, दर्यापुरात आ. बळवंत वानखडे व सहकारी, धारणीत आ. राजकुमार पटेल व मित्रपक्ष, धामणगाव रेल्वे बाजार समितीमध्ये माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वातील पॅनलने दबदबा कायम राखला आहे. पहिल्या टप्प्यातील महाआघाडीची घोडदौड दुसऱ्या टप्प्यातही कायम राहिली असली तरी यावेळी तीन बाजार समित्या गमवाव्या लागल्या आहे.