अमरावतीत भाजप, जिल्ह्यात काँग्रेस

By Admin | Updated: February 24, 2017 00:06 IST2017-02-24T00:06:01+5:302017-02-24T00:06:01+5:30

महापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे चित्र गुरुवारी उशिरापर्यंत स्पष्ट झाले. महापालिकेत ४५ जागा मिळवित भाजपने एकहाती सत्ता मिळविली तर

Amravati BJP, Congress in the district | अमरावतीत भाजप, जिल्ह्यात काँग्रेस

अमरावतीत भाजप, जिल्ह्यात काँग्रेस

अनपेक्षित : महापालिकेत स्पष्ट बहुमत, मिनीमंत्रालयात आघाडी
महापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे चित्र गुरुवारी उशिरापर्यंत स्पष्ट झाले. महापालिकेत ४५ जागा मिळवित भाजपने एकहाती सत्ता मिळविली तर मिनी मंत्रालयासाठी २६ जागा काबीज करुन काँग्रेस प्रमुख पक्ष म्हणून समोर आला आहे. महापालिकेत भाजपला यापूर्वी निवडणुकीच्या तुलनेत ३८ जागा अधिक मिळाल्या तर जिल्हा परिषदेत विद्यमान सत्तापक्ष असणाऱ्या काँग्रेसला यावेळी एक जागा अधिक मिळाली आहे. दोन्ही प्रमुख पक्षाला सत्तास्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे.

अमरावती: महायुती व आघाडी यांची ताटातूट झाल्यानंतर सर्वपक्ष स्वबळावर लढले. एकेका मतांसाठी झुंज झाली. त्यामुळे सत्तेचा कौल कुणाला? याविषयी संभ्रम होता. मात्र गुरुवारी दुपारी १२ नंतर चित्र स्पष्ट व्हायला लागले. मतमोजणीअंती महापालिकेत ४५ जागी विजयी मिळवित भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. १५ जागा मिळवित काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिली. एमआयएम पक्षाने महापालिकेत पहिल्यांदाच १० जागेवर विजय नोंदवून लक्ष वेधले आहे. या निवडणुकीत सेनेला ४ जागांचा फटका बसला आहे. सेनेचे ७ सदस्य विजयी झालेत. यापूर्वी १७ सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र यावेळी खातेही उघडता आले नाही.
मिनीमंत्रालयाच्या ५९ सदस्यांच्या सभागृहात २६ जागा मिळवित काँग्रेस सर्वात मोठा पक्ष समोर आला. काँग्रेस समर्थित रिपाइं (गवई) गटाला एक जागा मिळाल्याने काँग्रेस गोटात २७ सदस्य झालेत. बहुमतासाठी काँग्रेसला केवळ तीन सदस्यांची गरज आहे. या सभागृहात भाजपकडे १३ संख्याबळ आहे. भाजपला २०१२ च्या तुलनेत एक जागेचा फायदा झाला आहे. मात्र शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी फटका बसला आहे. यापूर्वी शिवसेनेचे सात सदस्य होते. यावेळी मात्र तीन सदस्यांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीचे सात सदस्य होते. त्यातुलनेत या निवडणुकीत पाच सदस्य निवडून आलेत. बसपाला एका जागेवर विजय मिळविता आला. यापूर्वी दोन सदस्य होते. प्रहारचे पाच सदस्य यावेळेही कायम आहेत. युवा स्वाभिमानने खाते उघडले आहे. यावेळी प्रथमच दोन सदस्य निवडून आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, लढा संघटना व अपक्ष असे प्रत्येकी एक सदस्य विजयी झालेत.

Web Title: Amravati BJP, Congress in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.