अमरावती-बडनेऱ्यात अद्यापही दूषित पाणी
By Admin | Updated: August 10, 2014 22:44 IST2014-08-10T22:44:40+5:302014-08-10T22:44:40+5:30
पंधरवाड्यापेक्षाही अधिक कालावधीपासून बडनेरा शहराला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने परिसरात आजारांचे प्रमाण वाढले आहेत. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे निर्माण होणाऱ्या साथरोगांचा

अमरावती-बडनेऱ्यात अद्यापही दूषित पाणी
श्यामकांत सहस्त्रभोजने - बडनेरा
पंधरवाड्यापेक्षाही अधिक कालावधीपासून बडनेरा शहराला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने परिसरात आजारांचे प्रमाण वाढले आहेत. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे निर्माण होणाऱ्या साथरोगांचा सामना करताना नागरिक हैराण झाले आहेत. घसा आणि पोटाच्या विकारांनी ग्रासलेल्या रुग्णांची गर्दी स्थानिक शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दिसून येत आहे.
मुदत संपलेल्या पाईपलाईन जीर्ण झाल्याने त्या ठिकठिकाणी फुटलेल्या आहेत. या पाईपलाईनमध्ये घाण पाणी शिरून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या तक्रारी आहेत. यामुळे जीवन प्राधिकरणच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे संपूर्ण बडनेरा शहरात पोटदुखीचे व घशाच्या आजारांचे रूग्ण आढळून येत आहेत. सर्वच दवाखान्यात रुग्णांची गर्दीे आहे. पावसाळ्यात नवीन पाणी येत असल्याने काही दिवस हा त्रास सुरू राहील, असे जीवन प्राधिकरणकडून बोलले जात आहे. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. ५० वर्षांपासूनच्या या पाईपलाईन अद्याप बदलविण्यात आल्या नाहीत. जीवन प्राधिकरणकडून तात्पुरत्या स्वरुपात दुरूस्ती केली जाते.