अमरावती : ‘एबी फॉर्म’ वाटपाच्या वादातून शहर काँग्रेसाध्यक्षांवर हल्ला
By Admin | Updated: February 3, 2017 15:10 IST2017-02-03T15:08:47+5:302017-02-03T15:10:16+5:30
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एबी फॉर्म वाटपाबाबत सुरू असलेल्या बैठकीदरम्यान उद्भवलेल्या वादात एका संतप्त कार्यकर्त्यांने काँग्रेस शहराध्यक्षांना बेदम मारहाण केली

अमरावती : ‘एबी फॉर्म’ वाटपाच्या वादातून शहर काँग्रेसाध्यक्षांवर हल्ला
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. ३ - महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एबी फॉर्म वाटपाबाबत सुरू असलेल्या बैठकीदरम्यान उद्भवलेल्या वादात एका संतप्त कार्यकर्त्यांने काँग्रेस शहराध्यक्ष संजय अकर्ते यांना बेदम मारहाण केली. या घटनेत तेथे उपस्थित काँग्रेसच्या महिला पदाधिकारी अर्चना सवाई या देखील जखमी झाल्या आहेत. राहुल तायडे असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी एबी फॉर्म वाटपासंदर्भात काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सुरू असताना शहराध्यक्षांनी हेतुपुरस्सर डावलल्याचा आरोप करीत राहुल तायडेसह अक्षय भुयार, संजय बोबडे, वैभव वानखडे, रवी रायबोले यांनी हा हल्ला केला.