अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वर्दळ मंदावली
By Admin | Updated: May 11, 2014 22:49 IST2014-05-11T22:49:59+5:302014-05-11T22:49:59+5:30
बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे शेतकरी, व्यापार्यांची वर्दळ कमी झाली आहे. सद्यस्थितीत ८ ते १० हजार पोत्यांची हजार पोत्यांची आवक होत आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वर्दळ मंदावली
अमरावती : बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे शेतकरी, व्यापार्यांची वर्दळ कमी झाली आहे. सद्यस्थितीत ८ ते १० हजार पोत्यांची हजार पोत्यांची आवक होत आहे. शेतकर्यांजवळ साठवणुकीचा शेतमाल नाही. तसेच खरीप हंगाम महिन्याभर्यावर आला असल्याने शेती मशागतीची लगबग सुरू झाली आहे त्यामुळे खरीप २०१४ च्या सोयाबीन, मूग व उडीदच्या उत्पादनापर्यंत साधारणपणे अशीच स्थिती राहणार आहे. मागील वर्षी आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यापासून सोयाबीनची आवक सुरू झाली होती. डागाळलेल्या सोयाबिनची साठवणूक करण्यापेक्षा शेतकर्यांनी सोयाबीन विकणे पसंत केले. परिणामी जिल्ह्यातूनच नव्हे तर अन्य जिल्ह्यामधून सोयाबीनची आवक बाजार समितीमध्ये वाढली होती. मागील १० वर्षातील आवकचे सर्व रेकॉर्ड या वाढत्या आवकमुळे तुटले. दररोज ४० ते ५० हजाराची आवक या तुलनेत व्यापार्यांनी खरेदी केलेल्या मालाची उचल कमी यामुळे शेतकर्यांना माल ठेवायला जागा राहत नव्हती. परिणामी बाजार समितीमध्ये आवक स्वीकारणे बंद करण्याची पाळी बाजार समितीवर आली. आवक वाढल्यामुळे बाजार समितीला वेळेत देखल बदल करावा लागला होता. वाढत्या आवकचे दुष्परिणाम झाले. व्यापार्यांनी षडयंत्र रचून भाव पाडला, शेतकर्यांना माल ठेवायला जागा नसल्याने पावसामुळे शेतमाल खराब झाला, वराई दरावरून व्यापारी, वाहतूकदार यांच्यात संघर्ष होऊन बाजार समिती बंद पडली. या सर्व प्रकारात बाजार समिती, शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल, वाहतूकदार यांची वर्दळ राहत असल्याने बाजार समिती फुलायची, परंतु सध्याच्या मोसमात शेतकर्यांची आवक कमी झाल्याने वर्दळ मंदावली आहे.