अमरावतीत २,६३८ कर्मचाऱ्यांना टोचली कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST2021-02-06T04:20:38+5:302021-02-06T04:20:38+5:30

अमरावती : कोरोनावरील लसीचा पहिला डोज प्राप्त होताच अमरावतीतही कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत अमरावतीतील २ हजार ६३८ ...

In Amravati, 2,638 employees were vaccinated against corona | अमरावतीत २,६३८ कर्मचाऱ्यांना टोचली कोरोना लस

अमरावतीत २,६३८ कर्मचाऱ्यांना टोचली कोरोना लस

अमरावती : कोरोनावरील लसीचा पहिला डोज प्राप्त होताच अमरावतीतही कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत अमरावतीतील २ हजार ६३८ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा प्रथम डोज देण्यात आला. लसीकरणाचा दुसरा टप्पा लवकरच होणार असून त्याबाबत नियोजन आरोग्य प्रशासन स्तरावर सुरू आहे.

आतापर्यंत अमरावतीतील २४५७ आरोग्य कर्मचारी व डॉक्टर तसेच १८५ फ्रंटलाईन वर्कर्सचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण आटोपल्याची माहिती गुरुवारी मनपा प्रशासनाकडून प्राप्त झाली.

प्रथम टप्प्यात डॉक्टर व आरोग्य सेवकांना कोरोना लस दिल्यानंतर आता विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस, होमगार्ड, पत्रकार, जेष्ठ नागरिक आदींचे लसीकरण होणार आहे. लसीकरणासाठी शहरात स्वतंत्र लसीकरण वेंâद्र उघडण्यात येत असून जिल्हा, विभागीय व आरोग्य मंत्रालय स्तरावरुन या जगातील सर्वात मोठया लसीकरण अभियानाचे सूत्रबध्द नियोजन करण्यात आले आहे. अमरावतीत कोरोना लस घेतलेल्यांना कुठलाच विपरीत परिणाम जाणवला नसल्याने संबंधित लस सुरक्षित असल्याची खात्री झाल्याचेही आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

बॉक्स-

आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे निर्देश

अमरावतील कोरोना विषाणू संक्रमणाचा खाली आलेला आलेख पुन्हा वाढीस लागला असून, दररोज दीडशेच्यावर कोरोना रुग्ण निघत असल्याने कोरोना संक्रमण प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे कठोर पालन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. शहरातील विषाणू संक्रमण प्रतिबंधासाठी पुन्हा सक्रिय झाल्याने नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांना दिले आहे.

बॉक्स

००० रुग्णांची वाढ, मृत्यूसंख्या ४२३ वर

शुक्रवारी सायंकाळपर्यंत अमरावती जिल्हयात आणखी ०००० नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. आणखी एका कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमरावतीतील एकुण कोरोना रुग्णांचा आकडा आता २२ हजार ००० इतका झाला असून आतापर्यंत कोरोनाचे दगावलेल्या रुग्णांची संख्या ४२३ वर पोहचली आहे. सध्या अमरावती जिल्हयातील ००० कोरोना रुग्णांवर विविध कोरोना रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी दिली.

Web Title: In Amravati, 2,638 employees were vaccinated against corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.