रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:17 AM2021-09-15T04:17:31+5:302021-09-15T04:17:31+5:30

श्रीहरी ऊर्फ मिलिंद सायखेडकर (२४, रा. नागपूर) असे जखमीचे नाव आहे. तो हिंदुजा फायनान्समध्ये कार्यरत आहे. धामणगाव तालुक्यातील अशोकनगर ...

An ambulance collided with a two-wheeler | रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक एक गंभीर

रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक एक गंभीर

Next

श्रीहरी ऊर्फ मिलिंद सायखेडकर (२४, रा. नागपूर) असे जखमीचे नाव आहे. तो हिंदुजा फायनान्समध्ये कार्यरत आहे. धामणगाव तालुक्यातील अशोकनगर येथील अमोल शालिक वाढवे, विनोद शालिक वाढवे हे दोघे भाऊ वर्धा येथील रुग्णवाहिका एमएच ३१ डीपी ९१६२ ने धामणगावकडे येतानाच जेबी पार्कसमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात श्रीहरी हा गंभीर जखमी झाला. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ येथे उपचारार्थ पाठविण्यात आले. रुग्णवाहिकेचा चालक दारू पिऊन असल्याचे त्यांच्या प्राथमिक तपासातून पुढे आले. घटनेचा अधिक तपास दत्तापूरचे सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद खेडकर करीत आहे. श्रीहरी हा धामणगाव येथील कृष्णा नगर ऑफिसच्या कामानिमित्त आला होता.

Web Title: An ambulance collided with a two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.