अंबानगरीतील लेकीचे दुसऱ्यांदा यूपीएससीत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 19:50 IST2023-05-23T19:50:20+5:302023-05-23T19:50:42+5:30
Amravati News शहरातील केवल कॉलनीत राहणाऱ्या वैशाली धांडे हिने यूपीएससी २०२२ च्या परीक्षेमध्ये ९०८ वी रँक प्राप्त केली आहे;

अंबानगरीतील लेकीचे दुसऱ्यांदा यूपीएससीत यश
अमरावती : भारतातील सर्वांत कठीण समजली जाणारी यूपीएससीच्या परीक्षेत अंबानगरीतील लेकीने सात वर्षांनंतर पुन्हा एकदा यश संपादन केले आहे. शहरातील केवल कॉलनीत राहणाऱ्या वैशाली धांडे हिने यूपीएससी २०२२ च्या परीक्षेमध्ये ९०८ वी रँक प्राप्त केली आहे; परंतु वैशाली ही पहिलेच नागपूर येथे जीएसटी कार्यालयात आयआरएसपदी कार्यरत असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
केंद्रीय लोकसेवा आयागाने मंगळवारी नागरी सेवा परीक्षा-२०२२ चा निकाल जाहीर केला आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात; परंतु काही मोजक्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये यश मिळते; परंतु अमरावतीच्या वैशाली धांडे हिने दुसऱ्यांदा या परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. वैशालीने यापूर्वी यूपीएससी-२०१६ मध्ये दुसऱ्या प्रयत्नातच यश संपादन केले होते. यावेळी तिला ९६४ वी रॅँक मिळाल्याने आयआरएस कॅडर मिळाले होते; परंतु यूपीएससी तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा आयएसएस होण्याचे स्वप्न मनामध्ये बाळगत असतो. हेच स्वप्न वैशालीचेही देखील होते. त्यामुळे तिने पुन्हा एकदा यूपीएससी-२०२२ ची परीक्षा दिली.
या परीक्षेतही तिला यश मिळाले; परंतु तिला ९०८ वी रॅँक मिळाली असून पुन्हा एकदा तिला आयआरएस कॅँडरच मिळाले आहे. सध्या वैशाली नागपूर येथील जीएसटी ऑडिट कार्यालयात कार्यरत आहे. त्यामुळे आयएसएससाठी तिसरा प्रयत्न करणार आहे का? यासंदर्भात विचारणा केली असता, यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे वैशाली धांडे हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.