अंबादेवी मार्ग अतिक्रमणमुक्त
By Admin | Updated: May 16, 2017 00:10 IST2017-05-16T00:10:10+5:302017-05-16T00:10:10+5:30
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे पोेलिसांच्या मदतीने सोमवारी अंबादेवी मार्गावरील अतिक्रमण हटवून...

अंबादेवी मार्ग अतिक्रमणमुक्त
राजकमल-गांधी चौक : दोन ट्रक साहित्य जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे पोेलिसांच्या मदतीने सोमवारी अंबादेवी मार्गावरील अतिक्रमण हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी तसेच पादचाऱ्यांसाठी मोकळा करण्यात आला.
सदर कारवाई राजकमल ते गांधी चौक, गांधी चौक ते परकोटालगत करण्यात आली.परकोटालगतच्या फळविक्रेत्यांच्या हातगाड्या जप्ती करण्यात आल्या. कारवाई दरम्यान हातगाड्याधारक त्यांच्या हातगाड्या घेऊन पळत असताना त्यांचा पाठलाग करून अंबागेट ते अंबादेवी मार्गावर त्यांना पकडून त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या. तसेच प्रभात चौक, नगर वाचनालय परिसरातील कपडे विक्रेते व रघुवीर हॉटेललगतचे खाद्य पदार्थ विक्रेते तसेच पानटपऱ्यांचे अतिक्रमण काढून साहित्य व हातगाड्या जप्त करण्यात आल्यात. याकारवाईमध्ये १५ हातगाड्या व किरकोळ साहित्य असे एकूण दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाई दरम्यान वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ठोसरे, अतिक्रमण पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, सहाय्यक विजय गावंडे, मनपा पोलीस पथकातील पीएसआय सुनील जामनेकर व पोलीस कर्मचारी गेडाम, राजेश घुरडे, भारत बघेल, अमोल पान्हेकर, किशोर कनोजे, सतीश खंडारे, संजय कोल्हे व इतर पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी व मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. अतिक्रमण हटाओ मोहीम राबविल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे.