अमरावती जिल्ह्यात साजरा झाला ट्रॅक्टर आणि गाढवांचा पोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 12:45 IST2018-09-10T12:44:28+5:302018-09-10T12:45:09+5:30
अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात असलेल्या चिंचोली बुद्रुक व पवनी तालुक्यातील शेलारी या गावी यंदा पोळ््याच्या दिवशी दोन अनोखी आयोजने गावकऱ्यांनी अनुभवली.

अमरावती जिल्ह्यात साजरा झाला ट्रॅक्टर आणि गाढवांचा पोळा
ठळक मुद्देबैलजोडी कमी असल्याचे कारण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात असलेल्या चिंचोली बुद्रुक व पवनी तालुक्यातील शेलारी या गावी यंदा पोळ््याच्या दिवशी दोन अनोखी आयोजने गावकऱ्यांनी अनुभवली. यात चिंचोली येथे कुंभार समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असल्याने त्यांनी गाढवांचा पोळा भरविला. तर शेलारी तालुक्यात बैल जोडीची कमतरता असल्याने शेतकऱ्यांनी आपापल्या ट्रॅक्टर्सचाच पोळा भरवला. या दोन्ही ठिकाणी हे पोळे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.