अमृतसरींच्या वर्षावाने अंबानगरी चिंब!
By Admin | Updated: June 13, 2015 00:20 IST2015-06-13T00:20:10+5:302015-06-13T00:20:10+5:30
असह्य उकाडा, उन्हाचा कडाका कमी झाल्यानंतरही ‘नवतपा’मुळे होणारी अंगाची लाही-लाही, वैताग आणि नुसता वैताग.

अमृतसरींच्या वर्षावाने अंबानगरी चिंब!
अमरावती : असह्य उकाडा, उन्हाचा कडाका कमी झाल्यानंतरही ‘नवतपा’मुळे होणारी अंगाची लाही-लाही, वैताग आणि नुसता वैताग. आभाळ काळवंडले की जराशी आशा पल्लवीत व्हायची. पण, पावसाचा मागमूस नाही. शेवटी दीर्घ प्रतीक्षेनंतर शुक्रवारी दुपारी अमृतधारा बरसल्या. उन्हाच्या रखरखीत खाणाखुणा धुवून निघाव्यात इतका दमदार पाऊस पडला. अंबानगरी चिंब झाली. भेगाळलेल्या जमिनीला आणि तप्त सजीवसृष्टीला दिलासा मिळाला. एक तास कोसळलेल्या जलधारांनी अंबानगरीतील रस्ते ओलेचिंब झाले. प्रत्येकाने आपल्या परिने या ‘पावसोत्सवा’चा आनंद लुटला.