अंबानगरीत अवतरले ६०० बालशिवाजी

By Admin | Updated: February 20, 2015 00:10 IST2015-02-20T00:10:44+5:302015-02-20T00:10:44+5:30

शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळावे, त्यांचा कार्याचा, विचारांचा कर्तव्यांचा प्रभाव या बालमनावर पडावा व या स्पर्धेच्या युगात ...

Amarnagar Avatarale 600 Balshivaji | अंबानगरीत अवतरले ६०० बालशिवाजी

अंबानगरीत अवतरले ६०० बालशिवाजी

अमरावती : शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळावे, त्यांचा कार्याचा, विचारांचा कर्तव्यांचा प्रभाव या बालमनावर पडावा व या स्पर्धेच्या युगात दप्तराच्या ओझ्याखाली दबलेला विद्यार्थी यामधून बाहेर यावा यासाठी पंचवटी परिसरातील अभ्यासा इंग्लिश स्कूलच्यावतीने 'मी शिवाजी, घरघर शिवाजी' हा नाविन्यपूर्ण उपक्रम गुरुवारी साजरा करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शाळेतील ५९५ विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारली होती. तसेच शिक्षिकांनी माँ जिजाऊची वेशभूषा साकारली होती. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मावळे बनले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आगळ्या पद्धतीने साजरी करून सामाजिक संदेश देण्याचा नामानिराळा प्रयत्न केला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, शिक्षण उपसंचालक राम पवार, सीसीएफ दिनेश त्यागी, सांख्यिकी विभागाच्या उपसंचालक वर्षा भाकरे, दिप्ती देशमुख, श्रीनाथ देशमुख, माजी महापौर राजेंद्र तायडे, प्रशांत वानखडे पालकवर्ग उपस्थित होते.

Web Title: Amarnagar Avatarale 600 Balshivaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.