शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील आमनेर किल्ला मरणपंथाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:10 IST

पुनर्निमाणाची गरज : सात बुरूज शाबूत धारणी : शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील भोकरबर्डी शिवाराला लागून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राची ...

पुनर्निमाणाची गरज : सात बुरूज शाबूत

धारणी : शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील भोकरबर्डी शिवाराला लागून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राची सीमा दर्शविणारी तापी नदी आहे. या नदीच्या गडगा आणि तापी संगमावर प्रसिद्ध आमनेर किल्ला आहे. पुरातन विभागाच्या सतत दुर्लक्षामुळे या किल्ल्याचे सौंदर्य दिवसेंदिवस हरवत चालले आहे. पर्यटक या निसर्गरम्य किल्ल्याच्या भेटीसाठी अधून-मधून येत असतात. सध्या किल्ल्याला तीनही बाजूंनी पाण्याने वेढले असून, केवळ पूर्वेकडून मार्ग आहे. हा किल्ला मोगल काळात संरक्षित मानला जात होता. आता याची पुरातन विभागात नोंद करून पुनर्निर्माणाची आवश्यकता पर्यटनप्रेमींनी केली आहे. बाहेरून सुरेख दर्शन देणारा हा किल्ला आतून मात्र मरणपंथाला टेकलेला आहे.

वर्धा, जाम, वसिष्ठा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर हा किल्ला आहे. आमनेरचा किल्ला अथवा झिल्पी आमनेर किल्ला हा पंचक्रोशीत अपरिचित किल्ला आहे. जिल्ह्याच्या वायव्येला हा किल्ला आहे. आमनेरचा किल्ला तापीनदी आणि गडगा नदी यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा टेकडीवजा उंचवट्यावर बांधलेला आहे. गडगा नदीच्या काठावरून आमनेर किल्ल्याचे सुरेख दर्शन घडते. या किल्ल्याला आमनेर हे नाव जवळ असलेल्या आमनेर गावावरून मिळाले आहे. हे आमनेर गाव ब्रिटिश आमदनीत वसाड झाले. गाव उठून गेल्यामुळे त्या गावाची वाटही मोडून गेलेली आहे. गडगा नदी ओलांडून गेल्यावर डावीकडे किल्ल्याचा ढासळत चाललेला बुरूज आपल्याला दिसतो. या बुरूजाकडे चढणाऱ्या वाटेने थोडेसे चढल्यावर उजवीकडील तटबंदीवर चढण्यास वाट आहे. या तुटक्या तटबंदीतून गडात प्रवेश होतो. गडाच्या मध्यभागी मारुतीचे लहान मंदिर आहे. त्यामागे वाड्याचे मोठे जोते शिल्लक असून त्याला मोठे तळघर आहे. चौकोनी आकाराच्या या छोट्याशा आटोपशीर किल्ल्याचे क्षेत्रफळ अगदी कमी आहे. त्यातूनही आत असलेल्या अनेक इमारती काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत. या किल्ल्यास ८ बुरूज असून त्यापैकी ७ शाबूत आहेत. नदीतील पाण्याच्या माराने एक बुरूज भग्न झाला आहे. काळ्या पाषाणात वितळविलेले शिसे ओतून याचा पाया मजबूत करण्यात आलेला आहे. यात जोडांसाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला आहे. हा किल्ला १२ व्या ते १३ व्या शतकापासून अस्तित्वात असावा. तीनही बाजुंनी पाणी आणि एका बाजुला खंदक अशी या किल्ल्याची रचना आहे. मात्र पुरातत्व विभागासह महसूल प्रशासनाचे त्यकडे दुर्लक्ष आहे?

गुप्तधनाच्या आशेने खोदकाम

गुप्तधनाच्या आशेने अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले. गडाचा मुख्य मार्ग उत्तराभिमुख असून त्या मार्गावरील दरवाजा नष्ट झाला आहे. तटबंदीही बरीचशी ढासळलेली आहे. चार कोपऱ्याला चार आणि मधे दोन दोन बुरूज मिळून किल्ल्याला एकंदरीत १२ बुरुज आहेत. तापी आणि गडगाच्या संगमाकडील बुरुजावरून नदीचे उत्तम दर्शन होते. याच तटबंदीमध्ये तापीनदीकडे जाणाऱ्या मार्गावर एक दिंडी दरवाजा आहे. ती वाट मोडल्यामुळे अवघड झालेली आहे.

ना होडी ना कुठली व्यवस्था

आमनेर किल्ल्याच्या जवळचे गाव म्हणजे भोकरबर्डी. हे गाव बु-हाणपूर ते अमरावती या मार्गावर आहे. आमनेरला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. धारणीकडून आल्यावर शाळा डावीकडे लागते. या शाळेच्या समोरूनच एक कच्चा मार्ग जातो. या कच्च्या मार्गाने दोन किलोमिटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूच्या माळरानावर मारूतीचे लहानसे मंदिर आहे. येथून आमनेर किल्ला दिसू लागतो. येथील पाऊलवाटेने पुढे चालत गेल्यावर गडगा नदीचे पात्र आडवे येते. नदी पात्रातून पाणी कमी असल्यास नदी ओलांडण्यास अडचण येत नाही. नदीला पाणी असल्यास नदी ओलांडणे धोकादायक ठरु शकते. येथे होडी वा नावेची व्यवस्था नाही.