अखेर अलउमर जिनींग प्रेसिंगचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST2021-04-07T04:13:48+5:302021-04-07T04:13:48+5:30
अंजनगाव सुर्जी : अकोट तालुक्यातील चार कापूस उत्पादकांचे १० लाख १० हजार ३७० रुपये बुडविणाऱ्या अंजनगाव एमआयडीसी परिसरातील अलउमर ...

अखेर अलउमर जिनींग प्रेसिंगचा परवाना रद्द
अंजनगाव सुर्जी : अकोट तालुक्यातील चार कापूस उत्पादकांचे १० लाख १० हजार ३७० रुपये बुडविणाऱ्या अंजनगाव एमआयडीसी परिसरातील अलउमर जिनिंग प्रेसिंगचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बाजार समितीने हा धडाकेबाज निर्णय घेतला.
शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित जिनिंग-प्रेसिंगच्या मालकास १० मार्च रोजी बाजार समितीमध्ये वादाचा निपटारा करण्यासाठी बोलावले असता, तो सभेला हजर राहिला नाही. तेव्हा संचालक मंडळाने रीतसर ठराव घेऊन पोलिसांत तक्रार दिली. याशिवाय जिनिंगच्या ६० हजारांचा सेसदेखील भरला नाही. त्यामुळे बाजार समितीने २१ मार्च रोजी झालेल्या मासिक सभेत अलउमर जिनिंग-प्रेसिंगचा परवाना रद्द करण्याचा सर्वानुमते ठराव घेतला. त्यानुसार, जिनिंग सील करण्याचाही कारवाई करण्यात आली. तशी जाहीर लेखी सूचनासुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती बाजार समिती सचिव गजानन नवघरे यांनी दिली.