ग्राम उदय अभियानांतर्गत अपंगांना साहित्य वाटप
By Admin | Updated: May 16, 2016 00:11 IST2016-05-16T00:11:05+5:302016-05-16T00:11:05+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अचलपूर तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन ग्राम उदय ते भारत उदय अभियानांतर्गत भीम महोत्सव आयोजित केला होता.

ग्राम उदय अभियानांतर्गत अपंगांना साहित्य वाटप
कांडली येथे कार्यक्रम : अचलपूर तालुक्यातील २५ सरपंच, उपसरपंचांचा गौरव
अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अचलपूर तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन ग्राम उदय ते भारत उदय अभियानांतर्गत भीम महोत्सव आयोजित केला होता. या उत्सवाच्या अनुषंगाने रविवारी अपंगांना साहित्य वाटप करून सरपंच, उपसरपंचांचा गौरव करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. बच्चू कडू, गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, सभापती सोनाली देशमुख, महिला बाल कल्याण सभापती अरूणा गोरले, भारत थोरात, सरपंच सुषमा थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. सुरूवातीला कांडली ग्रामपंचायतीच्यावतीने बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्ते बांधकाम, नाली बांधकामाचे लोकार्र्पणदेखील यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पश्चात पालकमंत्र्यांच्या हस्ते अचलपूर तालुक्यातील २५ सरपंच आणि उपसरपंचांचा गौरव करण्यात आला.
छत्रपती राजे संभाजी भोसले जन्मोत्सव याचवेळी परतवाडा येथे छत्रपती राजे संभाजी भोसले जन्मोत्सवानिमित्त आयोजित सदभावना रॅली तथा शेतकरी सन्मान परिषदेचे उदघाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. कडूंसह व्याख्याते संजीव सोनोने, प्रेमकुमार बोके, उपायुक्त रवींद्र ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिनेश ठाकरे आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी अन्न सुरक्षा योजना, राजीव गांधी आरोग्यदायी योजना, शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्ह्यात १०,६०० कृषी वीज पंपांना कनेक्श्न दिले, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकले. आ. बच्चू कडू यांनी यावेळी शेतकऱ्यांचे कष्ट मोजण्याची आवश्यकता व्यक्त करून शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी केली. उपस्थित इतर अतिथींनीदेखील समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. कृषी वीजपंपाचे वाटप यावेळी लाभार्थ्यांना पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)