परीक्षणात पक्षपाताचा आरोप
By Admin | Updated: November 9, 2014 22:26 IST2014-11-09T22:26:14+5:302014-11-09T22:26:14+5:30
इंद्रधनुष्य महोत्सवातील स्पर्धेत चमुच्या सादरीकरण क्रम चुकला तसेच स्पर्धकांच्या परीक्षणातही चुका झाल्या. स्पर्धेच्या मूल्यांकनाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्या चमुंनी सलग ११ वर्षे विजेतेपद

परीक्षणात पक्षपाताचा आरोप
मुंबई विद्यापीठ नाराज : सादरीकरणाचा क्रम चुकला
अमरावती : इंद्रधनुष्य महोत्सवातील स्पर्धेत चमुच्या सादरीकरण क्रम चुकला तसेच स्पर्धकांच्या परीक्षणातही चुका झाल्या. स्पर्धेच्या मूल्यांकनाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्या चमुंनी सलग ११ वर्षे विजेतेपद पटकाविले आहे. इंद्रधनुष्यमध्ये सर्वात्कृष्ट सादरीकरण केले आहे. मात्र निकालात पारदर्शकता नसल्याने चॅम्पियन ट्रॉफी मिळाली नाही, असा आरोप मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी अक्षय कांबळे यांनी केला .
इंद्रधनुष्य महोत्सवात मुंबई विद्यापीठातील चमुनी काही वैयक्तिक स्वरुपातील पारितोषिके मिळविली आहेत. या विद्यापीठाला एकूण ४९ गुण तर सर्वसाधारण विजेता संघ ठरलेल्या मुंबईच्याच एसएनडीटी विद्यापीठाला ५१ गुण मिळाले. केवळ दोन गुणांनी मुंबई विद्यापीठाचे जेतेपद हुकले. सलग ११ वर्षांपासून या स्पर्धेत प्राविण्यप्राप्त केलेल्या मुंबई विद्यापीठ संघाला यावेळी पराभवाचा सामना करावा लागला.
२७ वर्षे झोनल स्पर्धांमध्ये मुंबईच्या चमुने विजेतेपद पटकाविले आहेत. तसेच चमुंनी नॅशनलमध्येही बाजी मारली आहे. मात्र पहिल्यांदाच केवळ दोन गुणांनी मुंबई विद्यापीठाला ट्राफी मिळाली नाही. मुंबई विद्यापीठातील चमुंच्या कलाकारांचा दर्जा उत्तम आहे.
आतापर्यंत अनेक स्पर्धेमध्ये ते विजेता ठरले आहे. मात्र प्रथमच इंद्रधनुष्य २०१४ या युवा महोत्सव स्पर्धेत पारदर्शकता आढळून आली नाही. परीक्षकांनी स्पर्धेचे परीक्षण व्यवस्थित केले नाही, असे दिसून येत आहे. मूकनाट्यामध्ये मुंबईचे उत्कृष्ट कला सादर केली आहे. मात्र परीक्षणात काही चुका झाल्याचे आढळून येत आहे, असा आरोप मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी अक्षय कांबळे व निर्मला पवार यांनी केला आहे. लोकमतशी बोलताना ते पुढे म्हणाले की इंद्रधनुष्यामध्ये जरी चॅम्पियन ट्रॉफी मिळाली नाही. मात्र उत्कृष्ट सादरीकरण सिध्द करण्याकरिता पुढील झोनल स्पर्धेत नक्कीच विजेते पद टिकवून ठेवू तेव्हाच खऱ्या अर्थाने इंद्रधनुष्य महोत्सवातील आमचे महत्त्व कळले, असे मत त्यांनी व्यक्त केले. अमरावती विद्यापीठातील स्पर्धेच्या व्यवस्थेबद्दलची चांगलेपणा त्यांनी विशद केला. विद्यापीठातील वातावरणात चार दिवस कसे गेले कळलेच नाही. सर्व चांगले मिळाले. मात्र, केवळ स्पर्धेतील परीक्षणाचा सादरीकरण क्रम चुकल्याने गोंधळ उडाला, असे त्यांनी सांगितले. सलग पाच दिवस चाललेल्या या इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठ महोत्सवात राज्यातील २० विद्यापीठांच्या चमुंनी सहभाग घेतला होता. दरम्यान विविध स्पर्धेत दिमाखदार प्रदर्शन करून उपस्थितांचे लक्ष वेधले होते, हे विशेष.