सहायक सचिवांसह तिघेही निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:10 IST2020-12-27T04:10:34+5:302020-12-27T04:10:34+5:30
परतवाडा : अचलपूर बाजार समितीतील नोकर भरती प्रकरणात दोषी आढळल्याने पोलिसांत गुन्हे दाखल झालेल्या सहायक सचिवांसह दोन्ही शिपायांना निलंबित ...

सहायक सचिवांसह तिघेही निलंबित
परतवाडा : अचलपूर बाजार समितीतील नोकर भरती प्रकरणात दोषी आढळल्याने पोलिसांत गुन्हे दाखल झालेल्या सहायक सचिवांसह दोन्ही शिपायांना निलंबित करण्यात आले. त्यांची खातेचौकशी करण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सहायक सचिव मंगेश भेटाळू, शिपाई शैलेश शुक्ला व लता राकेश वाजपेयी, अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सन २०१९ मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे विविध पदे ऑनलाईन परीक्षेतून भरायची होती. त्यात संबंधितांनी संगतमताने मुदतीनंतर ऑनलाईन परीक्षा शुल्काचा भरणा केल्याचे अचलपूर पोलिसाच्या चौकशीत उघड झाले. त्यानंतर परतवाडा पोलिसांत संबंधितांविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर अचलपूर बाजार समितीच्या शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्या तिघांना निलंबित करण्यात आले. बाजार समितीच्या १८ संचालकांपैकी सभापती अजय टवलारकर, उपसभापती गोपाल लहाने, संचालक राजेंद्र गोरले, शिवबा काळे, गजानन भोरे, गंगाराम काळे, सतीश व्यास, वर्षा पवित्रकार, किरण शेळके, शाम मालू, आनंद गायकवाड, पोपट घोडेराव, विजय काळे, बाबूराव गावंडे हे हजर होते. गुन्हे दाखल झालेले तीनही आरोपी पसारच आहेत. ते अटकपूर्व जामीन घेण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.
कोट
पोलिसांच्या चौकशीत दोषी आढळलेल्या व गुन्हे दाखल झालेल्या सहायक सचिव व शिपायांचे निलंबन व खातेचौकशीचे आदेश शनिवारी झालेल्या बैठकीत दिले.
- अजय टवलारकर,
सभापती, बाजार समिती अचलपुर